breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारण

भोसरीचे राजकारण फिरलंय : पाच वर्षांपूर्वी ‘उनका टाईम था’…आता ‘महेश लांडगे का दौर आया है..!’

राष्ट्रवादी काँग्रेसकडून अधिकृत उमेदवार मिळालाच नाही

‘सोशल मीडिया’वर आमदार लांडगे समर्थकांचा ‘फुल्ल राडा’

पिंपरी । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

राजकारणात कधी कुणाचे ‘स्टार’ चमकतील, याचा नेम नाही. पाच वर्षांपूर्वी (२०१४) भोसरी विधानसभा मतदार संघातून उमेदवारी मिळावी म्हणून विद्यमान आमदार महेश लांडगे यांना राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप या प्रमुख पक्षांकडे उंबरे झिझवावे लागले होते. मात्र, उमेदवारी मिळाली नाही. पण, आज पाचवर्षांनंतर वेळ बदलली…आमदार लांडगे यांच्याविरोधात प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीकडे तगडा उमेदवार मिळाला नाही. त्यामुळे भोसरीचे राजकारण फिरलंय : पाच वर्षांपूर्वी ‘उनका टाईम था’…आता ‘महेश लांडगे का दौर आया है’ … असे चित्र निर्माण झाले आहे.

          ****

वास्तविक, सोशल मीडियाचा वापर करण्यात आमदार लांडगे यांच्या ‘टीम’  चा हात संपूर्ण महाराष्ट्रात कोण धरणार नाही. कोणत्याही बारिक हालचाली टिपण्यात माहीर असलेल्या ‘एमडी- टीम’ने २०१४ पूर्वीपासूनच आमदार लांडगे यांना ‘ब्रँन्ड’ म्हणून लोकांसमोर ठेवले आहे. २००९ मध्ये आमदार लांडगे राष्ट्रवादीत होते. पक्षाकडून स्थायी समिती सभापती होण्यासाठी मला लोकांचे उंबरे झिझवावे लागले, असे लांडगे जाहीर भाषणांत सांगतात. २००९ मध्येच विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असतानाही पक्षश्रेष्ठींनी त्यांची समजूत काढली. २०१४ मध्ये संधी देण्यात येईल, असे त्यावेळी सांगितले होते, असेही त्यांचे कार्यकर्ते ठामपणे सांगतात. पण, ऐनवेळी लांडगेंची उमेदवारी कापण्यात आली. त्यावेळी तत्कालीन आमदार विलास लांडे यांना पक्षाने उमेदवारी दिली होती. मात्र, २००९ च्या निवडणुकीनंतर पुन्हा २०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींनी डावलले. क्षमता असूनही संधी दिली नाही. ‘शब्द’ फिरवला.

यावर लांडगे यांनी अन्य प्रमुख पक्षांकडून उमेदवारीसाठी चाचपणी केली. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही गळ घातली. पण, हाती निराशा आली. त्यामुळे जिद्दीला पेटलेल्या महेश लांडगे यांनी आपल्या निवडक सहकाऱ्यांना सोबत घेवून २०१४ ची निवडणूक अपक्ष लढवण्याचा निर्णय घेतला. तत्कालीन आमदार विलास लांडे विरोधी संपूर्ण गट लांडगे यांच्या पाठिशी उभा राहिला. बघता-बघता महेश लांडगे निवडून आले…त्यावेळीपासून भोसरीतील राजकारण फिरले…

          दरम्यान, २०१७ मध्ये महापालिका निवडणूक झाली. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारुन आमदार लांडगे यांनी सर्वाधिक नगरसेवक निवडून आणले. राष्ट्रवादीचा पराभव झाला. शिवसेना तर मतदार संघातून अगदी हद्दपार झाली. कारण, महापालिका निवडणुकीत महायुती झालेली नव्‍हते. भाजप आणि शिवसेना स्वबळावर निवडणूक लढले होते. महापालिका निवडणुकीतील ऐतिहासिक विजयानंतर आमदार लांडगे यांची ताकद तुफान वाढली.

          त्यानंतर राज्यातील विधानसभा निवडणुकीची पडघम घुमू लागल्यानंतर पिंपरी-चिंचवडमधील भोसरी विधानसभा मतदार संघात विद्यमान आमदार महेश लांडगे आणि राष्ट्रवादीतील कोणत्या उमेदवाराची ‘बिग फाईट’ होणार? अशी चर्चा रंगली होती. माजी आमदार विलास लांडे, माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने, माजी नगरसेवक जालिंदर शिंदे, शिवसेनेचे कामगार नेते इरफान सय्यद आदी दिग्गज नेतो भोसरीचे मैदान मारण्यासाठी इच्छुक होते. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून यापैकी कुणालाही उमेदवारी मिळाली नाही. याउलट, राष्ट्रवादीची उमेदवारी नको…अशी भूमिका काहींनी घेतल्याचे बोलले जाते. परिणामी, महाअघाडीत भोसरी विधानसभा राष्ट्रवादीच्या वाट्याला असतानाही पक्षाला तगडा उमेदवार मिळाला नाही. पक्षाचे शहरातील मातब्बर नेते माजी आमदार विलास लांडे यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लांडे यांना पाठिंबा दिला. त्यामुळे विलास लांडे राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार झाले. परंतु, त्यांना उमेदवारीचे चिन्ह म्हणून ‘घड्याळ’ वापरता येणार नाही. त्यामुळे प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीला उमेदवारही मिळाला नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. विरोधी पक्षाकडे उमेदवार नाही…पण विरोधात तगडा उमेदवार आहे, असे चित्र भोसरीत तयार झाले आहे.

          सोशल मीडियात तरबेज असलेल्या आमदार लांडगे यांच्या समर्थकांनी यावर एकच धुरळा उडवला आहे. भोसरीचे राजकारण फिरलंय : पाच वर्षांपूर्वी ‘उनका टाईम था’…आता ‘महेश लांडगे का दौर आया है..!’ अशा आशयाचा पोस्ट फिरत आहेत. काहीअंशी ही वस्तुस्थितीही आहे, यात शंका नाही.

****

लांडगे समर्थकांचा सोशल राडा कसा आहे वाचा…

# ५ वर्षांपूर्वी आपल्या महेशदादाला कोणत्याच पक्षाने उमेदवारी दिली नाही आणि आज या पैलवानासमोर एकपण पक्षाकडे उमेदवार नाही.

# असली पेहलवान की पेहचान आखाडे मे नही…जिंदगी मे होवे है…ताकी जब जिंदगी तुम्हे पटके तो तुम फिर खडे हो…और ऐसा ताव मारो…जो जिंदगी चित हो जाये..!

# याला म्हणतात ताकद…सबंध महाराष्ट्रातला असा एकमेव आमदार ज्याच्या विरुद्ध कुठला पक्ष उमेदवार देवू शकला नाही…

# बिनविरोध…#  भोसरी…अख्या महाराष्ट्रात २८८  पैकी २८७ ठिकाणी पक्षाचे उमेदवार…पण, फक्त पैलवानाच्या विरोधात लढायला उमेदवार नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button