breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

भोसरीची ‘दादा’गिरी संपवून भयमुक्त करणार – माजी आमदार विलास लांडे

भोसरी विधानसभा मतदारसंघात माजी आमदार विलास लांडेना राष्ट्रवादीचा पाठिंबा

माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने हे लांडेचे राहतील प्रचारप्रमुख, राष्ट्रवादीची जबरदस्त खेळी

पिंपरी |महाईन्यूज|

भोसरी विधानसभा मतदारसंघातील ‘दादा’गिरी संपवून भय व भ्रष्टाचारमुक्त करणार आहे. ‘भोसरी व्हीजन 2020’ चे पाच वर्षात काय झाले ते जनतेने बघितले आहे, अशी टिका माजी आमदार विलास लांडे यांनी केली.

भोसरी विधानसभा मतदार संघाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून माजी आमदार विलास लांडे यांना पुरस्कृत उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे. तसेच, माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनीही अपक्ष अर्ज भरला आहे. साने हे अर्ज मागे घेतील आणि लांडे राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार राहणार आहेत.

लांडे म्हणाले की, भोसरी ही कष्टकरी, कामगारांची नगरी आहे. भोसरीत गुन्हेगारी, दहशत, भयमुक्त करणार आहोत. या मतदारसंघात वाढलेला भ्रष्टाचार संपविणार आहे. महिला व मुलीसाठी सुरक्षित मतदारसंघ करणार आहोत. तसेच वाढलेली बेरोजगारीने युवक बेजार झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात भोसरी हा एक नंबर कसा होईल, कला, क्रीडा, साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रातही नाव उंचावण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. असेही ते म्हणाले.

उमदेवारी अर्ज भरल्यानंतर शहराध्यक्ष संजोग वाघेरे म्हणाले की, भोसरी विधानसभा मतदार संघामध्ये माजी आमदार विलास लांडे, माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने आणि माजी नगरसेवक जालिंदर शिंदे असे मातब्बर नेते इच्छुक होते. त्यामुळे पक्षाच्या वतीने पुरस्कृत उमेदवार म्हणून आम्ही विलास लांडे यांच्या नावाची घोषणा केली आहे.

छे.. हे तर ‘व्हिजन टपरी-टपरी’ – दत्ता साने

भोसरी विधानसभा मतदारसंघात ‘भोसरी व्हिजन 2020’ चे धिंदवडे उडाले आहेत. त्या माध्यमातून काहीच कामे झालेली नाहीत. मेट्रो, स्मार्ट सिटी, संतपीठ, क्रींडागणे, रस्ते आदी प्रश्न प्रलंबित आहेत. बेरोजगारी वाढलीय, औद्योगिक दहशत वाढत चाललीय, काही समाजकंटकामुळे महिला व मुलींची सुरक्षितता धोक्यात आलेली आहे. त्यामुळे ‘भोसरी व्हिजन 2020’ चे गोंडस बाळ जन्माला येवून त्याचे आता ‘व्हिजन टपरी-टपरी’ झाल्याची टीका विरोधी पक्षनेते दत्ताकाका साने यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button