breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भाविकांच्या अडचणी लक्षात घेता माजी महापौर योगेश बहल व मित्र परिवाराच्या वतीने “श्री गणेश मुर्ती विसर्जन व मुर्ती दान” उपक्रम

पिंपरी|प्रतिनिधी|

पिंपरीमधील संत तुकाराम नगर येथील रहिवाशांच्या पर्यावरणीय समस्या लक्षात घेऊन नदिघाटावरील गणेश मुर्तीच्या विसर्जनावर बंदी घालण्यात आली आहे. म्हणूनच गणेश भक्तांच्या भावनेचा विचार करुन माजी महापौर योगेश बहल व वीरेंद्र बहल मित्र परिवाराच्या वतीने “श्री गणेश मुर्तीचे विसर्जन व मुर्ती दान उपक्रम” सुरु करण्यात आला आहे.

भाविकांच्या अडचणी लक्षात घेता, कृत्रिम हौदाची निर्मिती

नागरिकांना गणेश मुर्तीचे घरी विसर्जन करतांना ज्या अडचणी आल्या त्याबद्दल भाविकांनी चर्चा केली. हे ऐकल्यानंतर भाविकांची अडचण विचारात घेऊन चार छोट्या टेंम्पोमध्ये कृत्रिम हौद तयार करून हे चारही टेंम्पो कार्यकर्ते संपूर्ण संत तुकाराम नगर परिसरात 1 सप्टेंबर पर्यंत सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 9 पर्यंत फिरवून मुर्ती विसर्जन करुन घेणार आहेत. 27 ऑगस्ट पासूनच या उपक्रमाला सुरवात झाली होती. तसेच भाविकांनी या उपक्रमाचा लाभ घेऊन पर्यावरण रक्षणासाठी हातभार लावावा. असे आवाहनही या उपक्रमाद्वारे करण्यात आले आहे.

दरम्यान योगेश बहल व वीरेंद्र बहल मित्र परिवाराने सुरु केलेल्या या विसर्जनाच्या उपक्रमासाठी काही नियमही आखण्यात आले आहेत.

  • गणेश भक्तांनी विसर्जनाची आरती घरीच करावी.
  • तसेच मुर्ती विसर्जनासाठी दोन व्यक्तींनीच यावे.
  • लहान मुले व ज्येष्ठ नागरीकांनी विसर्जनात सहभाग शक्यतो घेऊ नेय.
  • मास्क, सॅनिटायझर वापरावे. सोशल डिस्टन्स पाळावा.
  • निर्माल्य स्वतंत्र कागदी पिशवित आणावे.

गणेश मुर्तीचे पावित्र्यं राखून विसर्जन करणे होणार शक्य

या उपक्रमामुळे नागरिकांना नक्कीच बाप्पाचे विसर्जन करणे सोपे होणार आहे. तसेच गणेश मुर्तीचे पुर्ण पावित्र्यं राखून मनोभावे विधीवत पध्दतीने विसर्जनही करण शक्य होणार आहे. आणि सध्या कोरोनाच्या परिस्थितीत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नागरिकांसाठी हा उपक्रम नक्कीच उपयुक्त ठरणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button