breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

भारत-ब्रिटन विमान वाहतूक 7 जानेवारीपर्यंत बंद

नवी दिल्ली – ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार आढळल्यानंतर केंद्र सरकारने ३१ डिसेंबरपर्यंत भारत आणि ब्रिटनमधील हवाई वाहतूक रोखण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता हा विषाणू भारतातही हातपाय पसरू लागल्याने ही विमान वाहतूक बंदी वाढविण्यात आली आहे. ब्रिटनहून येणाऱ्या आणि ब्रिटनला जाणाऱ्या विमान वाहतुकीवरील निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार आता ७ जानेवारीपर्यंत भारत आणि ब्रिटनमधील हवाई वाहतूक बंद असेल.

ब्रिटनमध्ये आधीच्या तुलनेत अधिक धोकादायक असलेला कोरोनाचा नवा प्रकार आढळून आल्यानंतर केंद्र सरकारने २१ डिसेंबरला ब्रिटनहून भारताकडे येणारी हवाई वाहतूक रोखण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी २२ डिसेंबरला रात्री ११ वाजून ५९ मिनिटांनी सुरू झाली. हा निर्णय ३१ डिसेंबरपर्यंत लागू होता. मात्र ब्रिटनहून बहरतात आलेल्या २० प्रवाशांमध्ये कोरोना विषाणूचा नवा स्ट्रेन आढळून आल्याने आरोग्य विभागाची धाकधूक वाढली आहे. त्यामुळे भारत आणि ब्रिटनमधील हवाई वाहतूकीवरील बंदीची मर्यादा 7 जानेवारीपर्यंत वाढविण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button