breaking-newsआंतरराष्टीय

भारत-पाकची इच्छा असल्यास काश्मीरप्रश्नी मध्यस्थीला तयार; नॉर्वेच्या पंतप्रधानांची ग्वाही

भारत आणि पाकिस्तानमधील अत्यंत संवेदनशील विषय असलेल्या काश्मीरप्रश्नावरुन नॉर्वेच्या पंतप्रधान इर्ना सोलबर्ग यांनी मोठे विधान केले आहे. जर या दोन्ही देशांची संमती असेल तर काश्मीरप्रश्नी आम्ही मध्यस्थाची भुमिका निभावू शकतो, असे त्यांनी म्हटले आहे. सोलबर्ग या तीन दिवसीय भारताच्या दौऱ्यावर आल्या आहेत. दरम्यान त्यांनी सोमवारी दिल्लीत बोलताना त्यांनी आपले मत व्यक्त केले.

ANI

@ANI

View image on Twitter

ANI

@ANI

Norway PM, Erna Solberg on if Norway would have a role in sorting out differences b/w India&Pakistan: It has to be partner driven,it has to be those who are part in the conflict. Both are big enough to make sure they can decrease tension b/w them, without help from outside.(2/2) pic.twitter.com/2UYRxWuaL3

View image on Twitter

तसं तर काश्मीरचा प्रश्न सोडवण्याची भारत आणि पाकिस्तान या दोघांमध्ये क्षमता आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना कोणाही बाहेरच्या देशाच्या मदतीची गरज नाही. लष्कराच्या जोरावर आपण प्रश्न सोडवू शकतो मात्र, तरीही अडचणी कायम राहतात. त्यामुळे अशा प्रश्नांवर शांततेत तोडगा काढायला हवा. मला आशा आहे की, या दोन्ही देशांमध्ये पुन्हा संवाद सुरु होईल. दोन्ही देशांचा सर्वाधिक खर्च हा लष्करावर होतो. कारण तुमच्यात मैत्रीपूर्ण वातावरण नाही. तुमचा सर्वाधिक पैसा हा नागरिकांच्या शिक्षण आणि आरोग्यावर खर्च व्हायला हवा, असे सोलबर्ग यांनी म्हटले आहे.

Nils Ragnar Kamsvåg@nrkamsvaag

PM @erna_solberg has not offered to mediate between India and Pakistan as has been erroneously reported. Norway has neither been asked nor offered to mediate.

दरम्यान, नॉर्वेच्या पंतप्रधानांचे हे वक्तव्य चुकीच्या पद्धतीने सांगितले गेल्याचा दावा नॉर्वेचे अॅम्बॅसिडर निलस रागनार कामस्वाग यांनी एका ट्विटद्वारे केला आहे. सोलबर्ग यांनी भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये मध्यस्थी करणार असल्याचे कोणतेही वक्तव्य केले नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, सोलबर्ग या मंगळवारी दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेणार आहेत. यावेळी त्यांच्यामध्ये काश्मीरवरुन दीर्घ काळासाठी शांतता नांदावी याबाबत चर्चा होणार आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button