breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

भारतात २ वर्षांच्या चिमुकलीला कोरोनाच्या नव्या प्रकाराची लागण

मेरठ – जीवघेण्या कोरोना विषाणूचे संकट असतानाच वर्षाखेरीस जगावर कोरोनाचा नवा विषाणूही कोसळला आहे. कोरोनाच्या या नव्या प्रकाराने जगभरात खळबळ उडविली आहे. ब्रिटनमधून भारतात आलेल्या काही नागरिकांनादेखील नव्या कोरोनाची लागण झाल्याने आरोग्य यंत्रणा अलर्टवर आहे. याच दरम्यान 2 वर्षांच्या चिमुकलीमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लंडनहून एक कुटुंब उत्तर प्रदेशातील मेरठ येथे दाखल झालं. या कुटुंबातील चौघांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्यांचे नमुने दिल्लीत तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यानंतर या चौघांपैकी 2 वर्षीय चिमुकलीला नव्या कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून हे कुटुंब राहत असलेला परिसर पूर्णपणे सील करण्यात आला आहे. तसेच प्रशासनाकडून या परिसरातील नागरिकांच्या चाचण्या केल्या जात आहेत.

दरम्यान, कोरोनाचा नवा स्ट्रेन ब्रिटनपाठोपाठ युरोपमधील बर्‍याच देशांमध्ये आढळला आहे. आतापर्यंत डेन्मार्क, नेदरलँड्स, ऑस्ट्रेलिया, इटली, स्वीडन, फ्रान्स, स्पेन, स्वित्झर्लंड, जर्मनी, कॅनडा, जपान, लेबेनॉन, सिंगापूर या देशांनंतर आता भारतातदेखील नव्या कोरोनाचा शिरकाव होत असल्याचे आढळून आल्याने भीतीचे वातावरण आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button