breaking-newsराष्ट्रिय
भारतात २४ तासांत तब्बल ७७ हजार २६६ नवे कोरोना रुग्ण
नवी दिल्ली – भारतातील कोरोनाबाधितांची संख्या ३३ लाखांच्या पुढे गेली आहे. मागील दोन दिवसांपासून देशात दिवसभरात ७५ हजारांहून अधिक रुग्ण आढळत आहेत. गेल्या २४ तासांत देशात तब्बल ७७ हजार २६६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर १ हजार ५७ रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. यासह देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ३३ लाख ८७ हजार ५०१ वर पोहोचली आहे. यापैकी सध्या ७ लाख ४२ हजार २३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत ६१ हजार ५२९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे २५ लाख ८३ हजार ९४८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
देशात कोरोना चाचणीची संख्या झपाट्याने वाढल्याने रुग्णसंख्याही वाढत आहे. महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश व तामिळनाडू या प्रमुख राज्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.