breaking-newsताज्या घडामोडीव्यापार

भारतात मार्केटिंगवर फेसबुकचा भर, मार्केटिंग प्रमुखपदी अविनाश पंत यांची नियुक्ती

सोशल मीडियाची दिग्गज कंपनी फेसबुक भारतात मार्केटिंगवर अधिक भर देणार असल्याचं दिसतंय. कारण, कंपनीने अविनाश पंत यांची फेसबुक इंडियाचे मार्केटिंग प्रमुख (विपणन संचालक) म्हणून नियुक्ती केली आहे. शुक्रवारी याबाबत कंपनीकडून माहिती देण्यात आली आहे.

अविनाश पंत यांची विपणन संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विपणन संचालक हे नवं पद असेल आणि फेसबुक, इंस्टाग्राम व व्हॉट्सअॅपसह फेसबुकच्या मालकिच्या सर्व अॅप्सवरील मार्केटिंगच्या प्रयत्नांवर देखरेख ठेवण्याची मुख्य जबाबदारी त्यांच्यावर असेल. पंत यांच्याकडे २२ वर्षांचा अनुभव असल्याची माहिती फेसबुकने दिली आहे. पंत यांच्याकडे यापूर्वी नाइकी, कोकाकोला, दी वॉल्ट डिज्नी कंपनी आणि रेडबुल यांसारख्या कंपन्यांसोबत काम करण्याचा मोठा अनुभव आहे. रेडबुलचे भारतातील मार्केटिंग प्रमुख म्हणून त्यांनी अखेरची जबाबदारी सांभाळली होती. ब्रँड म्हणून रेडबुलची ओळख निर्माण करण्याची त्यांच्यावर मुख्य जबाबदारी होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button