breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

भारतातील कोरोना रुग्णांनी ओलांडला एक लाखांचा आकडा

नवी दिल्ली | भारतात कोरोना रुग्णांनी एक लाखांचा आकडा ओलांडला आहे. मंगळवारी आरोग्य मंत्रालयाकडून अपडेट माहिती देण्यात आली. त्यानुसार आता भारतात एकूण कंफर्म केसेसची संख्या ही एक लाख 1 हजार 139 एवढी झाली आहे. तर मृतांची संख्या ही 3 हजार 163 झाली आहे. दिलासादायक बातमी म्हणजे आतापर्यंत 39 हजार 174 लोक बरे झाले आहेत. आतापर्यंत देशात 58 हजार 802 अॅक्टिव्ह केस आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचा हाहाकार सर्वात जास्त आहे. येथे रुग्णांची संख्या 35 हजार पेक्षा जास्त झाली आहे. तर मृतांची संख्या ही 1249 एवढी झाली आहे. तर गुजरातमध्ये कोरोना पीडितांचा आकडा हा 11 हजार 745 पर्यंत गेला आहे. तर मृतांचा आकडा 694 वर गेला आहे.

तामिळनाडूमध्येही कोरोना कहर वाढत आहे. आता येथे 11 हजार 760 रुग्ण आढळले आहेत. यामधील 81 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा 10 हजार पार झाला आहे. मंत्रालयाच्या अपडेटनुसार दिल्लीमध्ये एकूण 10 हजार 54 रुग्ण आहेत. यामधील 168 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर राजस्थानमध्ये आतापर्यंत 5 हजार 507 कंफर्म केस समोर आले आहेत. यामध्ये 138 लोकांचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशमध्ये आतापर्यंत 5 हजार 236 प्रकरण समोर आले आहेत. यामध्ये 252 लोकांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशातही कोरोना रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. आता येथे रुग्णांची संख्या ही 4605 एवढी झाली आहे. यामध्ये 118 लोकांनी आपला जीव गमवला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button