breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

भायखळ्यात चौरंगी लढत

मुंबई:- दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या भायखळा विधानसभा मतदारसंघात कोणत्याही एका पक्षाला आपली मक्तेदारी निर्माण करता आलेली नाही. विधानसभेच्या प्रत्येक निवडणुकीत या मतदारसंघातील मतदारांनी वेगवेगळ्या पक्षाच्या उमेदवारांच्या गळ्यात विजयश्रीची माळ घालून विधानसभेत पाठविले. मागील निवडणुकीत या मतदारसंघाने एएमआयएमच्या बाजूने कौल दिल्याने मुंबईकरांना धक्का बसला होता. या मुस्लीमबहुल मतदारसंघात शिवसेना, काँग्रेस, एएमआयएम आणि अ. भा. सेनेमध्ये अटीतटीची लढत होत असून मतदार कोणाच्या पारडय़ात दान टाकणार याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.

२०१४ च्या निवडणुकीत भायखळा मतदारसंघातील मतदारांनी सर्वानाच धक्का दिला. काँग्रेसने विद्यमान आमदार मधु चव्हाण यांना, तर भाजपनेही मधु चव्हाण यांना रिंगणात उतरविले होते. एएमआयएमचे वारिस पठाण या मतदारसंघात नशीब आजमावत होते. मतदारांनी चक्क वारिस पठाण यांच्या पारडय़ात मतांचे दान टाकले आणि त्यांचा विजय झाला. वारिस पठाण केवळ १,३५७ मताधिक्याने विजयी झाले. पण हा निकाल राजकारण्यांनाच नव्हे, तर मुंबईकरांनाही अनपेक्षित होता. या पाश्र्वभूमीवर होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत एएमआयएमने विद्यमान आमदार वारिस पठाण यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. तर अरुण गवळीची कन्या आणि अ. भा. सेनेच्या नगरसेविका गीता गवळी या मतदारसंघातून निवडणूक लढवीत आहेत. शिवसेना-भाजपची युती झाल्यानंतर भायखळा मतदारसंघ शिवसेनेला मिळाला. शिवसेनेने पालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या पत्नी आणि माजी नगरसेविका यामिनी जाधव यांना भायखळा मतदारसंघाच्या आखाडय़ात उतरविले आहे. तर काँग्रेसने मधु चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button