breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भाजी मंडई आणि स्केटींग ग्राऊंडचे उद्घाटन करा; नगरसेवक विक्रांत लांडे यांची मागणी

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – भोसरीतील प्रभाग ८ (इंद्रायणीनगर) मधील भाजी मंडई आणि स्केटींग ग्राऊंडचे नामकरण करून उद्घाटन करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे नगरसेवक विक्रांत लांडे यांनी केली आहे. पिंपरी महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांना लांडे यांनी याबाबत निवेदन दिले आहे.

यासंदर्भात लांडे यांनी निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील अत्यंत प्रगत औद्योगिक शहर म्हणून पिंपरी-चिंचवडला ओळखले जाते. पालिकेच्या वतीने इंद्रायणीनगर येथे नव्याने झालेल्या भाजी मंडईचे काम पूर्ण झालेले आहे. तरीही, गेल्या अनेक वर्षांपासून मंडई वापराविना पडून आहे. येथील भाजीमंडई जुगाराचा व दारूचा अड्डा बनली आहे. या मंडईचे लवकरात लवकर उद्घाटन केल्यास या परिसरातील नागरिकांना फायदा होणार आहे.

येथील स्केटींग ग्राऊंडचे काम देखील पुर्णत्वास आले असल्यामुळे या ग्राऊंडचे नामकरण व उद्घाटन करणे गरजेचे आहे. या भाजीमंडईला संत तुकाराम महाराज भाजी मंडई आणि स्केटींग ग्राऊंडला संभाजी महाराज स्केटींग ग्राऊंड असे नामकरण करण्यात यावे, अशी मागणी विक्रांत लांडे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button