breaking-newsराष्ट्रिय

भाजप प्रत्येक मतदार संघाचा प्रमुख नेमणार

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीला समर्थपणे सामोरे जाण्यासाठीची तयारी भारतीय जनता पक्षाने सुरू केली असून पक्षाने देशातील सर्व 543 लोकसभा मतदार संघांसाठी मतदार संघ प्रमुख नेमण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे ठरवले आहे. तसेच प्रत्येक राज्यात निवडणुकीच्या तयारीसाठी 11 सदस्यांची एक समिती स्थापन केली जाणार आहे. मतदार संघाचा प्रमुख हा मतदार संघाबाहेरील असेल. आणि त्याच्यावर या मतदार संघाच्या सर्वंकष तयारीची जबबादारी असेल. अशा प्रकारची रचना बहुजन समाज पक्षात असते. त्याच पद्धतीचा अवलंब आता भाजपने करायचे ठरवले आहे. राज्यांसाठी नेमल्या जाणाऱ्या 11 सदस्यांच्या समितीला चुनाव तैय्यारी टोळी असे संबोधले जाणार असून त्यांच्यावर तेरा प्रकारची जबाबदारी सोपवली जाणार आहे. या रचनेसाठी पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी देशातल्या सर्व राज्यांचा दौरा सुरू केला असून त्याची सुरूवात त्यांनी 10 जूनच्या छत्तीसगड दौऱ्यापासून केली आहे.

प्रत्येक लोकसभा मतदार संघासाठी तीन जणांची समिती सोशल मिडीया हॅंडल करण्यासाठी नेमली जाणार असून तीन जणांची समिती प्रसार माध्यमांशी संपर्क ठेवण्यासाठी नेमली जाणार आहे. तीन जणांची समिती कायदेविषयक बाबी तपासण्यासाठी नेमली जाणार असून दोन जणांची समिती केंद्र व राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीसाठी नेमली जाणार आहे. असा चोख बंदोबस्त प्रत्येक मतदार संघासाठी केला जाणार असून त्याद्वारे अत्यंत मजबूतीने लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी पक्षाने सुरू केली असल्याची माहिती पक्ष सूत्रांनी दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button