breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

भाजप पदाधिकाऱ्याला धमकी देणारा अटकेत

‘व्हॉट्सअ‍ॅप’ समुहावर घडलेल्या शाब्दीक बाचाबाचीनंतर भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्याला जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या तरुणाला कांजुरमार्ग पोलिसांनी अटक केली. रुपेश शेट्टी असे या तरुणाचे नाव आहे. याच विभागातील एका नगरसेवकाने त्याला पदाधिकाऱ्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप समुहात सहभागी करून घेतल्याची माहिती मिळते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भाजप पदाधिकारी आणि कोकण विकास आघाडीचे ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष विश्वास घाग यांच्या तक्रारीवरून आरोपीविरोधात हत्येच्या धमकीसह विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

विधानसभा निवडणुकीनिमित्त विक्रोळी मतदारसंघातील प्रचार फेरीबाबत संबंधीत व्हॉट्सअ‍ॅप समुहावर चर्चा सुरू होती. या समुहात नव्यानेच सहभागी झालेल्या रुपेशने असभ्य भाषेत मजकूर लिहिण्यास सुरूवात केली. तेव्हा घाग यांनी रुपेशकडे परिचय मागितला तसेच सभ्य भाषेत चर्चेची विनंती केली. त्यावर रुपेशने घाग यांना उद्देशून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ सुरू केली. ठार मारण्याची धमकी दिली. काही वेळाने रुपेशने घाग यांना प्रत्यक्ष गाठून पुन्हा तशीच धमकी दिली.

या घटनेला अनेक साक्षीदार होते. त्यामुळे हा प्रसंग क्षणात विक्रोळी मतदारसंघातील तमाम राजकीय कार्यकर्त्यांपर्यंत क्षणार्धात पोहोचला. घाग यांच्यासोबत भाजप आणि मनसेचे पदाधिकारी पोलीस ठाण्यात जमले. यात मनसेचे उमेदवार विनोद शिंदे यांचाही सहभाग होता. या घटनेत रुपेशने घाग यांच्यावर पिस्तूल रोखल्याची चर्चा होती. मात्र ही अफवा असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button