breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भाजप नगरसेविका जयश्री गावडे यांच्याकडून निवडणूक आयोगाची फसवणूक

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – चिंचवड येथील भाजपच्या नगरसेविका जयश्री गावडे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक लढविताना त्यांचे शालेय शिक्षण आठवी नापास असताना उमेदवारी अर्जात दहावी उत्तीर्ण दाखविले आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाची आणि माहापालिकेची फसवणूक जयश्री गावडे यांनी केली आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते आशिष गावडे यांनी केली आहे.

याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पुणे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना चिंचवड सामाजिक कार्यकर्ते आशिष गावडे यांनी निवेदन दिले आहे. सन 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत जयश्री गावडे या चिंचवड प्रभाग क्रमांक 19 आनंदनगर, भाटनगरमधून भाजपच्या तिकीटावर निवडून आल्या आहेत.

नगरसेविका गावडे यांचे शालेय शिक्षण आठवी नापास आहे. त्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यात आठवी नापास असा उल्लेख आहे. मात्र, निवडणुकीतील उमेदवारी अर्जात त्यांनी शिक्षण दहावी उत्तीर्ण दाखवले आहे. नगरेसेविका गावडे यांनी महापालिकेसह सरकारला चुकीची माहिती देऊन फसवणूक केली आहे. त्यामुळे गावडे यांची चौकशी करून योग्य कारवाई करण्यात यावी, अशी मागणी गावडे यांनी निवेदनातून केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button