breaking-newsTOP Newsमहाराष्ट्रमुंबईविदर्भ

भाजपला मोठा धक्का, उत्तर महाराष्ट्रातील भाजपचे अनेक नेते राष्ट्रवादीच्या वाटेवर

मुंबई | महाईन्यूज

राष्ट्रवादीच्या गोठातून एक मोठी बातमी समोर येत असून भाजपला खिंडार पाडणार असल्याचे संकेत मिळत आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून भाजपमधील अनेक नेते राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांच्या संपर्कात असल्याची माहिती समजते. त्यामुळे राज्यातील सत्ता गमावल्यानंतर भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

उत्तर महाराष्ट्रामधील भाजप नेते राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत. त्यामुळे याच भागातून पक्ष प्रवेशाला सुरुवात होणार आहे. यासंबंधी एनसीपी कार्यालयात शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील यासह उत्तर महाराष्ट्र राष्ट्रवादी आमदारांची बैठक सुरू आहे. इतर पक्षातील विशेषत भाजपातील काही नेते यांना राष्ट्रवादी पक्षप्रवेश द्यायचा का याबाबत खलबत सुरू असल्याची चर्चा आहे. सध्या अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यामध्ये महत्त्वाची बैठक सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस सध्या वेट अँड वॉच भूमिकेमध्ये असल्याचं सांगण्यात येत आहे. जोपर्यंत भाजत नेते पक्षात प्रवेशाची अधिकृत घोषणा करत नाहीत, तोपर्यंत इतर पक्षातील नेत्यांसोबत चर्चा करणार नाही, अशी भूमिका राष्ट्रवादीकडून जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यातच परभणीचे माजी अपक्ष आमदार आणि अभ्युदय को ऑपरेटिव्ह बँकेचे मानद अध्यक्ष सीताराम घनदाट आणि त्यांचे नातू भरत घनदाट यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनीही खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी प्रिया बेर्डे यांचा मुलगा अभिनय आणि स्वानंदी देखील उपस्थित होते. तर, यावेळी चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकारांनी देखील राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि नियुक्त्या देखील करण्यात आल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button