breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भाजपच्या राज्यात सर्वसामान्य माणसाला जगणे मुश्किल : अजित पवार

नाशिक, (महा-ई-न्यूज) –  भाजपच्या काळात देशातील सर्वसामान्य नागरिकांना जगणे मुश्किल झाले आहे. आघाडी सरकारच्या काळात ४०० रुपयांना मिळणारा गॅस सिलिंडर आता ९०० रुपयांना झाला आहे. दूध उत्पादक शेतक-यांना मिळाणारा दूधाचा भाव लीटरला २५ रुपयांवरून २० रुपयांपर्यंत घसरला आहे. लाखांचा पोशिंदा असलेल्या शेतकरी आज हालाखीचे जीवन जगत आहे. शहरी भागातील लोकांचीही अवस्था हालाखीची आहे. ही बाब केंद्र सरकारला कळत नाही का? राज्य सरकारच्या लक्षात येथील लोकांच्या अपेक्षा येत नाहीत का? असा प्रश्न माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यात ‘निर्धार परिवर्तनाचा’ ही यात्रा सुरू केली आहे. त्याअंतर्गत नाशिक येथील जाहीर सभेत बोलताना अजित पवार यांनी भाजप सरकारच्या धोरणांवर घणाघात केला.

अजित पवार म्हणाले की, राज्यातील मंत्रीमंडळातील मंत्री काय करतात? महाराष्ट्राच्या काणाकोप-यात काय चालले आहे.  त्यांना राज्यातील समस्या दिसत नाहीत. भाजपच्या सरकारच्या काळातच पुनतांब्यातील शेतकरी पहिल्यांदा संपावर गेला. शेतक-यांना का संप करावा लागतो. शेतक-याच्या मालाला भावही मिळाला पाहिजे. तसेच शहरीभागातील ग्राहकांनाही शेतीमालाचा भाव परवडला पाहिजे. आमच्या काळात शेतकरी, कांदा उत्पादकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.

नुसत्या घोषणा…अन्‌ नुसती आश्वासने…

भाजपच्या नेत्यांनी सांगितले होते दूधाला लीटरपाठीमागे पाच रुपये अनुदान देतो. राज्यातील शेतक-यांना लीटरपाठीमागे पाच रुपये अनुदान मिळाले नाही. आम्ही सभागृहात आवाज उठवतो. मात्र, त्यावर अंमलबजावणी होत नाही. आम्ही सत्तेत असताना जातीय सलोखा राखण्याचा प्रयत्न केला. पण, भाजपच्या काळात सलोखा बिघडला. मात्र, नाशिकमध्ये महिला अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता आहे. मात्र, लोकांना समान न्याय देण्यात भाजप अपयशी ठरले आहेत. छगन भुजबळांच्या काळात नाशिकमध्ये विकास झाला. त्याप्रमाणे गेल्या साडेचार वर्षांत नाशिककरांना काय मिळाले? भाजपने दिलेली आश्वासने पूर्ण केली का? असा प्रश्नही अजित पवार यांनी यावेळी उपस्थित केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button