breaking-newsराष्ट्रिय

भाजपच्या यादीतील हुतात्मा सापडला जीवंत

बंगळुरू – भारतीय जनता पक्षाने कर्नाटकातील निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर जिहादी घटकांकडून हुतात्मा झालेल्या 23 जणांची एक यादी प्रसिद्ध केली आहे पण त्यातील एक हुतात्मा चक्क जीवंत असल्याचे आढळून आल्याने भाजपची पंचाईत झाली आहे.

भाजपच्या उडुपीतील लोकप्रतिनिधी शोभा करंजदलजे यांनी जिहादी घटकांकडून गेल्या पाच वर्षात मारल्या गेलेल्या 23 जणांची एक यादी गृहमंत्र्यांना पाठवून त्यांच्या हत्येची चौकशी करण्याची मागणी केली आहे. पण या यादीत ज्यांचे पहिले नाव आहे ते अशोक पुजारी हे जीवंत असल्याचे आढळून आले आहे. आज काही दूरचित्रवाणी वाहिन्यांनी त्यांची मुलाखतही प्रकाशित केली. पुजारी हे उडुपी जिल्ह्यातील आपल्या गावात राहतात. ते बजरंग दल आणि भाजपचे काम करतात. सन 2015 मध्ये त्यांच्यावर जिहादी गटांनी हल्ला करून त्यांना ठार मारल्याचे भाजपचे म्हणणे आहे.

पुजारी म्हणाले की त्यावेळी सहा माणसांनी आपण हिंदुत्ववादासाठी काम करतो म्हणून आपल्यावर हल्ला केला होता. त्यात आपण गंभीर जखमी झालो होतो पण त्यातून आपण सुखरूप बचावलो आहोत. भाजपचे दोन डझन कार्यकर्ते कॉंग्रेसच्या गेल्या पाच वर्षाच्या काळात जिहादी हल्ल्यात ठार झाल्याचे स्वता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कर्नाटकातील एका सभेत सांगितले होते. तथापी आपला या हुतात्म्यांच्या यादीत चुकुन समावेश करण्यात आल्याचे पुजारी यांनी सांगितले. राज्य सरकारनेही हा दावा फेटाळू लावला असून त्यांनी म्हटले आहे की या 23 मृत्यंपैकी 14 मृत्यूंशी मुस्लिमांच्या हल्ल्याचा काही संबंध नाही. आत्महत्या किंवा वैयक्तीक भांडणातून या 14 जणांची हत्या झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button