breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भाजपच्या नगरसेविका सुजाता पालांडे यांच्यावर गुन्हा दाखल

पिंपरी – टपरीधारकाच्या आत्महत्तेप्रकरणी भाजपच्या विद्यमान नगरसेविका सुजाता पालांडे यांच्यासह त्यांच्या पतीवर सोमवारी (दि. 28) पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

 

सचिन सुरेश ढवळे (रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) असे आत्महत्या करणा-या व्यक्तीचे नाव आहे. आत्महत्या करताना त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यामध्ये भाजप नगरसेविका सुजाता सुनील पालांडे यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे लिहिले होते. याबाबत सचिनचा भाऊ शरद सुरेश ढवळे (वय 38) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पालांडे यांच्यासह मृत सचिन ढवळे याची पत्नी शशिकला सचिन ढवळे (वय 40, रा. संत तुकारामनगर, पिंपरी) यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन याचे संत तुकारामनगर मधील गोल भाजी मंडईजवळ फॅब्रिकेशनचे टपरीवजा दुकान आहे. सोमवारी मध्यरात्री सचिनने नगरसेविका सुजाता सुनील पालांडे, शशिकला ढवळे यांच्या त्रासाला कंटाळून त्याने राहत्या घरात घरी छताला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सचिन याला आत्महत्या करण्यास नगरसेविका पांलाडे यांनी प्रवृत्त केले असल्याचे, फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button