breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भाजपच्या त्या नगरसेवकावर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत माघार नाही, डॉक्टरांचा पवित्रा

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरीतील भाजपच्या त्या नगरसेवकावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही अशी मागणी करत वायसीएममधील डॉक्टरांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात काल रात्री पिंपरीतील एका भाजपच्या नगरसेवकाने धिंगाणा घातला. डॉक्टरांना शिवीगाळ केली. दरम्यान, रात्री कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी वायसीएममधील वरिष्ठ डॉक्टरांना अनेदा फोन केला असता त्यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे डॉक्टरांनी आज सकाळी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत संबंधित भाजपच्या नगरसेवकावर फौजदारी गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आम्ही काम बंद ठेवणार असल्याचा पवित्रा डॉक्टरांनी घेतला आहे. त्यामुळे वायसीएममधील रुग्णांवर होणारे उपचार थांबविण्यात आल्याने रुग्णांचे हाल होत आहेत.

याची माहिती समजताच आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या सूचनेनंतर अतिरिक्त आयुक्त अजित पवार आणि संतोष पाटील वायसीएमकडे रवाना झाले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button