breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

भाजपच्या ड्रीम (वेस्ट टू एनर्जी) प्रोजेक्टला पक्षांतर्गत घरघर

  • भाजप नगरसेविका माया बारणे यांनी मागितला खुलासा
  • अंतर्गत वादामुळे प्रकल्पाला घातला जातोय खोडा?

पिंपरी – पिंपरी-चिंचवडमध्ये होणा-या वेस्ट टू एनर्जी प्रकल्पामध्ये भाजपच्या उच्चस्तरीय नेत्यांचा इंट्रेस्ट असल्याने स्थानिक नेत्यांना तो प्रकल्प पचनी पडत नसल्याचे संकेत मिळत आहेत. त्यासाठी शहरातील एका बलाढ्य गटातील भाजपच्या नगरसेविका यांनी या महत्वाकांक्षी प्रकल्पाला विरोध दर्षविला आहे. प्रकल्पाबाबत आम्ही अनभिज्ञ असून जोपर्यंत प्रकल्पाची रूपरेषा कळत नाही. तोपर्यंत आमचा प्रकल्पाला विरोध राहिल. प्रशासनाने याचा खुलासा करावा, अशी मागणी करत भाजपच्या नगरसेविका माया बारणे यांनी आपल्याच पक्षाचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाला बुधवारी (दि. 18) पत्रकार परिषदेत विरोध दर्षविला आहे.

भोसरी परिसरात होणा-या वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाला 208 कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. डीबीओटी तत्वावर राबविण्यात येणा-या या प्रकल्पाचा उद्देश काय, प्रकल्पासाठी मशिनरी कोठून आणणार, 1 टन कच-यापासून किती राख तयार होते, निर्माण होणा-या राखेची विल्हेवाट कशी लावणार, त्याचा पर्यावरणावर घातक परिणाम होणार नाही का, एक टन कच-यापासून किती वीज निर्मिती होते, ती वीज एमएसईबी विकत घेणार का, त्यासंदर्भात एमएसईबीसोबत चर्चा झाली आहे का, ती वीज मनपा कोठे वापरणार, त्यासाठी केबल, खोदाई, फीडर याचे नियोजन केले आहे का, प्रकल्पास पाणी किती लागणार, ते कोठून उपलब्ध करणार, या प्रश्नांचा खुलासा प्रशासनाने करावा, अशी मागणी नगरसेविका बारणे यांनी केली आहे.

पालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये कन्स्ट्रक्शन अॅण्ड डिमॉलिशन वेस्ट मॅनेजमेंट प्रकल्प डीबीओटी तत्वावर राबविण्यात येणार आहे. त्यासाठी 30 कोटी रुपये खर्च होणार आहेत. मनपा 10 कोटी रुपये देणार आहे. पालिकेचे दहा आणि ठेकेदाराचे वीस अशे एकूण 30 कोटी कशा पध्दतीने खर्च करणार, याचा खुलासाही बारणे यांनी मागितला आहे. संबंधित ठेकेदाराचा अनुभव, वार्षिक ताळेबंद, हे निकष प्रतिदिनी 850 ते 900 टन कचरा संकलीत करणा-या ठेकेदारांना का लावले नाहीत, असा प्रश्नही बारणे यांनी उपस्थित केला आहे. वेस्ट टू एनर्जी प्रकल्पात राजकीय हस्तक्षेप होत आहे. या प्रकल्पात बड्या नेत्यांचा हात असल्याने काही नेत्यांना संबंधितांनी मर्जित न घेतल्यामुळे भाजपांतर्गत विरोध होत असल्याची चर्चा नागरिकांत सुरू आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button