breaking-newsमुंबई

भाजपच्या आमदाराला कोरोनाची बाधा

भिवंडी : महाराष्ट्रातील आणखी एका आमदाराला कोरोनाची लागण झाली आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसनंतर आता भाजपच्या आमदाराला कोरोनाची बाधा झाली आहे. ठाणे जिल्ह्यातील या भाजप आमदाराला कोरोना झाल्याचं आज उघड झालं आहे. या आमदारांचा आजच कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यांना ताप आणि घसा खवखवण्याचा त्रास होता. लक्षणे दिसल्यामुळे त्यांची कोरोना चाचणी केली असता, त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

यापूर्वी ठाकरे सरकारमधील तीन मंत्र्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. सर्वात आधी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, मग सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि त्यानंतर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. या तिघांनीही कोरोनावर मात केली आहे.

तीनच दिवसापूर्वी राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. संध्याकाळी चारच्या सुमारास धनंजय मुंडेंना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णालयातून बाहेर पडताना धनंजय मुंडे यांनी हात उंचावून आणि हात जोडत डॉक्टर, नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांचे आभार मानले होते. रुग्णालयातून डिस्चार्ज दिला असला तरी नियमानुसार पुढील 14 दिवस धनंजय मुंडे यांना होम क्वारंटाईन राहावे लागणार आहे.

त्याआधी काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही कोरोनावर मात केली. अशोक चव्हाण यांना 4 जून रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. चव्हाण यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे 25 मे रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मुंबईतील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button