breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

भाजपचे मुंबई अध्यक्ष लोढा ५०० कोटींचे धनी

मुंबई : मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांची मालमत्ता जवळपास ५०० कोटींची असून, गेल्या दहा वर्षांत त्यांच्या मालमत्तेत अनेक पटींनी वाढ झाली आहे.

लोढा यांनी भाजपतर्फे मलबार हिल मतदारसंघातून मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यात त्यांनी ५०० कोटींची मालमत्ता जाहीर केली आहे. १० वर्षांपूर्वी २००९च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी स्थावर ३४ आणि जंगम ३४ अशी ६८ कोटींची मालमत्ता आणि ७ कोटींचे कर्ज असल्याचे लोढा यांनी जाहीर केले होते.

२०१४ च्या निवडणुकीत लोढा यांनी उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची एकूण मालमत्ता २०० कोटी रुपयांची असल्याचे म्हटले होते. तर आता दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार नेपीएन्सी रोड येथे श्रीमंताच्या वस्तीत राहणाऱ्या लोढांच्या राहत्या घराची किंमत ४४ कोटी ४९ लाख असून आणखी एका घराची किंमत ९ कोटी ७३ लाख रुपये आहे. तर २०० कोटींचे कर्ज आहे. विशेष म्हणजे काही सरकारी पण वादातील अशी दीड कोटींची देणी थकल्याचेही लोढांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button