breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

“भाजपकडून अजित पवारांना अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद आणि 20 मंत्रिपदांची ऑफर”

मुंबई | शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. भाजपने अजित पवारांना अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद देण्याचं कबूल केलं असून त्यामुळेच अजित पवारांनी सत्तास्थापनेला पाठिंबा दिल्याचा गौप्यस्फोट राऊत यांनी केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. भाजपने शिवसेनेला दिलेलं आश्वसन पाळलं नाही, मात्र अजित पवारांना मुख्यमंत्री देण्याचं कबूल केलं, असंही संजय राऊत यांनी नमूद केलं.

संजय राऊत म्हणाले, “भाजपने अजित पवारांना अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद आणि 20 मंत्रिपदं देण्याची ऑफर दिल्याची बातमी मी ऐकली आहे. यात किती सत्य आहे हे मला माहिती नाही. मात्र, माध्यमांमधून मला ही माहिती मिळाली आहे. त्यामुळे अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाचे जे आश्वासन शिवसेनेला दिलं गेलं, ते पाळलं गेलं नाही. आता हेच अजित पवार यांना अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाचं आश्वासन देण्याचा व्यापार करत आहेत. हे खरं असंल तर काय सुरु आहे हे महाराष्ट्राची जनता पाहात आहे. राष्ट्रवादीच्या काही आमदारांना गुडगावमध्ये ठेवण्यात आलं, धमकावण्यात आलं, हरियाणात त्यांचं सरकार असल्याने बाहेर पोलीस ठेवण्यात आले.”

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button