breaking-newsपुणे

भाच्यास मारहाण केल्याचा जाब विचारल्याने एकावर हल्ला

पुणे – भाच्यास मारहाण केल्याचा जाब विचारत एकावर तलवारीने वार करण्यात आला. ही घटना कोथरुड येथील केळेवाडी येथे शुक्रवारी रात्री घडली. याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी तीघांविरुद्द गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी सोमनाथ खंडागळे (41, रा. केळेवाडी, कोथरुड) याची संजय ऊर्फ बाळू वाघमारे याच्याबरोबर पूर्वी भांडणे झाली होती. या भांडणाचा राग मनात धरून संजयने सोमनाथला घराबाहेर बोलावून घेतले. यानंतर माझा भाचा गोपाळ यास का मारले, असा जाब विचारत जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्यावर तलवारीने वार केला.

मात्र, हा वार सोमनाथ याने हुकवला असता तलवारीच्या मागचा भागाचा वार मांडीवर लागला. त्यात जखमी झाले. यावेळी फिर्यादीची मुलगी भांडणे सोडविण्यास मध्ये पडली असता तिच्यावरही तलवार उगारण्यात आली. यानंतर इतर साथीदारांनी फिर्यादीला लाथा-बुक्‍क्‍यांनी मारुन जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक एम.व्ही. राऊत तपास करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button