breaking-newsमहाराष्ट्र

भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक : राष्ट्रवादीचे उमेदवार मधुकर कुकडे विजयी

भंडारा : भंडारा-गोंदिया मतदारसंघातील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपला जोरदार हादरा दिला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार मधुकर कुकडे हे ४० हजारांहून अधिक मतांनी विजयी झाले. त्यांनी भाजपचे उमेदवार हेमंत पटले यांचा दारुण पराभव केला.

खासदार नाना पटोले यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत खासदारकीचाही राजीनामा दिला होता. त्यामुळे भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. भाजपने हेमंत पटले यांना मैदानात उतरवून ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेसनं मधुकर कुकडे यांना उमेदवारी दिली. शिवसेना आणि काँग्रेसने उमेदवार उभे केले नाहीत. त्यामुळे पटले आणि कुकडे यांच्यातच थेट लढत झाली. सुरुवातीपासूनच आघाडीवर असलेल्या कुकडे यांनी अखेर पटले यांचा पराभव केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button