breaking-newsराष्ट्रिय

भंडारा-गोंदिया पुन्हा राष्ट्रवादीला…

  • प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी 

नवी दिल्ली – कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना भंडारागोंदियाची जागा राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. कॉंग्रेसप्रणित संपुआच्या काळात हा मतदारसंघ राकॉकडेच होता, हे विशेष.

खासदारकीचा राजीनामा देवून कॉंग्रेसमध्ये सामील झालेले नाना पटोले यांनी आज कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेवून भंडारा गोंदियाबाबत चच्रा केली. ही जागा कॉंग्रेसच लढविणार अशी भूमिका नाना पटोले यांनी घेतली होती. मात्र, हायकमांडच्या निर्णयानंतर पटोले यांनी आपली तलवार म्यान केली. एवढेच नव्हे तर, राकॉच्या उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी पटोले यांच्या खांद्यावर टाकली आहे.

मुळात, भंडारागोंदिया मतदारसंघ हा राकॉंचाच होता. मात्र, 2014 च्या निवडणुकीत भाजप उमेदवाराच्या रूपात पटोले यांनी प्रफुल्ल पटेल यांचा पराभव केला होता. खासदारकीचा राजीनामा देवून पटोले कॉंग्रेसमध्ये सामील झाल्यामुळे हा मतदारसंघ आता कॉंग्रेसकडेच राहील असे त्यांना वाटत होते. परंतु, कॉंग्रेस हायकमांडने राकॉसाठी हा मतदारसंघ सोडला. राकॉंकडून प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button