breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबई

ब्रेकिंग न्यूज : मराठा आरक्षण संदर्भात आज मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक!

मुंबई | प्रतिनिधी

महाराष्ट्रात मराठा समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळ उपसमितीची तातडीने बैठक घेण्यात येणार आहे.

मंत्रालयातील सूत्रांनुसार, आज गुरूवार, दि. १० सप्टेंबर २०२० रोजी सायंकाळी ६.३० वाजता ‘वर्षा’ बंगला, मुंबई येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक होणार आहे. या बैठकीला उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, दिलीप वळसे पाटील, विजय वडेट्टीवार तसेच राज्याचे महाधिवक्ता, राज्य शासनाचे वकिल व संबंधित अधिकारी उपस्थित राहतील.
या बैठकीत प्रामुख्याने सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशानंतर निर्माण झालेली परिस्थिती व पुढील रणनितीवर चर्चा होईल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button