breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

ब्रिटन हादरलं! कोरोनाचा आणखी एक प्रकार आढळला

लंडन – कोरोना विषाणूच्या नव्या प्रकारातून ब्रिटन सावरत नाही तोच त्याहून अधिक संसर्गजन्य आणखी एक कोरोना विषाणू आढळून आला आहे. यामुळे ब्रिटन हादरलं आहे. दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांमध्ये कोरोनाचा आणखी एक नवीन प्रकार आढळून आला आहे, अशी माहिती ब्रिटनचे आरोग्य सचिव मॅट हॅनकॉक यांनी बुधवारी दिली. त्यामुळे विषाणूचा नवा अवतार दक्षिण आफ्रिकेतून आल्याचा संशय व्यक्त करत गेल्या दोन आठवड्यांत दक्षिण आफ्रिकेहून आलेल्या सर्व नागरिकांनी स्वत:ला आयसोलेट करण्याच्या सूचना ब्रिटन सरकारने दिल्या आहेत.

कोरोनाचा पहिला नवा प्रकार दक्षिण पूर्व इंग्लंडमध्ये सापडला होता. मात्र आता तो संपूर्ण देशात पसरला आहे. अशातच आणखी एक नवा प्रकार सापडल्यामुळे घबराट पसरली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेत सापडलेला अवतार यूकेत सापडलेल्या अवतारापेक्षा अधिक खतरनाक असल्याचे मानले जाते. कारण त्याच्या संसर्गाचा वेग अधिक जास्त आहे.

दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या नव्या प्रकाराचा संसर्ग झालेल्या दोन बाधित व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिकेच्या प्रवासावरही निर्बंध लावण्यात आले आहेत. दक्षिण आफ्रिकेतील कुठल्याही व्यक्तीशी संपर्कात आलेल्या सर्व ब्रिटनच्या रहिवाशांनाही क्वारंटाईन होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर कोरोनाच्या नव्या अवताराबाबत संशोधन केले जात आहे. तसेच ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी या पार्श्वभूमीवर निर्बंध लागू केले आहेत. परिस्थितीचा आढावा घेऊन निर्बंध आणखी कठोर करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. तर नाताळ सण साजरा करण्यासाठी लागू केलेल्या नियमावलीत कोणतेही बदल करण्यात आले नसल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button