breaking-newsराष्ट्रिय

ब्रह्म दत्त येस बँकेचे नवे अध्यक्ष? बँकेची आरबीआयकडे शिफारस

अशोक चावला यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त असलेल्या येस बँकेच्या अध्यक्षपदी ब्रह्म दत्त यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. येस बँकेकडून नवीन अध्यक्षपदासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे ब्रह्म दत्त यांच्या नावाची शिफारस केली असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. नोव्हेंबर महिन्यात अशोक चावला यांनी राजीनामा दिला होता.

दत्त हे पूर्वीपासून येस बँकेतच कार्यरत असून त्यांना बँकेची व्यवस्था चांगल्या पद्धतीने माहितीये, त्यामुळे अध्यक्षपदासाठी दत्त योग्य असतील अशी शिफारस येस बँकेकडून करण्यात आल्याची सुत्रांची माहिती आहे. त्यांनी या अगोदर स्वतंत्र निर्देशक म्हणून काम पाहिले आहे.

दत्त हे एक निवृत्त नोकरशाह आहेत आणि सध्या ते स्वतंत्र निर्देशक म्हणून बँकेत काम पाहत असून त्यात आठ सदस्य आहेत. यामध्ये बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राणा कपूर, लेफ्टिनेंट जनरल मुकेश सभरवाल, सुभाष कालिया, अजय कुमार, प्रतिमा शियोरी, उत्तम अग्रवाल आणि टीएस विजयन यांचा समावेश आहे.

राणा कपूर यांना बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर ३१ जानेवारीपर्यंतच राहता येईल, असे आदेश रिझव्‍‌र्ह बँकेने यापूर्वीच दिले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button