breaking-newsराष्ट्रिय
बोगस मतदार ओळखपत्र प्रकरण ; काँग्रेस आमदारावर गुन्हा दाखल
बंगळुरु : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मतदानाला अवघा एक दिवस उरलेला असताना पोलिसांनी बनावट मतदान ओळखपत्र प्रकरणात विद्यमान काँग्रेस आमदारासह १४ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दोन दिवसांपूर्वी बंगळुरुतील एका अपार्टमेंटमधील घरातून १० हजार बनावट मतदान ओळखपत्रे जप्त करण्यात आली होती.
या प्रकरणी राजा राजेश्वरी नगर मतदारसंघातील उमेदवार आणि काँग्रेसचे विद्यमान आमदार एन. मुनीरथना यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘ज्या फ्लॅटमध्ये बनावट मतदान ओळखपत्रे सापडली तिथे माझी प्रसिद्धी पत्रक होती. म्हणून माझ्या नावाचा आरोपींमध्ये समावेश करण्यात आला. हे संतापजनक असून मला अपमानित करुन त्रास देण्याच्या प्रचारतंत्राचा एक भाग आहे’ असे मुनीरथना यांनी सांगितले. निवडणूक आयोगाने याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.