breaking-newsमनोरंजन

बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वीच सारा अली खान अडकली वादाच्या भोवऱ्यात

सुशांत सिंग राजपूत आणि सारा अली खानची मुख्य भूमिका असलेला केदारनाथ हा चित्रपट गेल्या काही महिन्यांपासून कोणत्या ना कोणत्या वादामध्येच अडकलेला आहे. केदारनाथ हा चित्रपट वादात अडकला असल्याने सारा अली खानने सिम्बा हा चित्रपट नुकताच साईन केला. पण आता साराने चित्रपट साइन केला असल्याने या चित्रपटाचा दिग्दर्शक अभिषेक कपूरने साराच्या विरोधात तक्रार दाखल केलेली आहे.

सारा आणि अभिषेक यांच्यात चित्रीकरणाच्या तारखांवरून वाद झाला असल्याचे म्हटले जात आहे. सारा अली खानने केदारनाथ या चित्रपटाशी संबंधित करार गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये साइन केला होता. साराने त्यावेळी त्यांना चित्रपटासाठी तारखा देण्याचे कबूल केले होते. केदारनाथ या चित्रपटाच्या पुढील शेड्युलचे चित्रीकरण आता मे महिन्यापासून ५ जुलैपर्यंत होणार आहे. पण सारा जून महिन्यात रणवीर सिंगसोबत सिम्बा या चित्रपटाचे चित्रीकरण करत असल्याने तिला जूनमध्ये चित्रीकरण करणे शक्य नसल्याचे तिच्या एजंटने केदारनाथच्या टीमला कळवले आहे. त्यामुळे अभिषेक यांनी कोर्टाचे दार ठोठावले आहे. केदारनाथ या चित्रपटाचे चित्रीकरण संपल्याशिवाय सारा कोणत्याही चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करू शकत नाही असे त्यांच्या वकिलांनी कोर्टासमोर मांडले आहे. एवढेच नव्हे तर साराने करार तोडल्यामुळे तिने पाच कोटी रुपयांचा दंड भरावा अशी देखील मागणी त्यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button