breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

बैलगाडा शर्यत; ‘पेटा हटाव…महाराष्ट्राची संस्कृती बचाव..’

– भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचा नारा
– बैलगाडा शर्यतीसाठी चाकणमध्ये एल्गार
पिंपरी- राज्यातील शेतक-यांच्या जिव्‍हाळ्याचा विषय असलेल्या बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू करण्यात ‘पेटा’ या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी खोडा घातला आहे. त्यामुळे ‘पेटा’ हटाव..असा नारा देत, भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी राज्यव्यापी आंदोलनात सहभाग घेतला.
सत्ताधारी भाजप सरकार शर्यतीबाबत सकारात्मक आहे. पण, बैलगाडा मालकांचा खरा शत्रू ‘पेटा’ आहे. कारण, सरकारने विधेयक मंजूर करुन कायदा तयार करण्याची प्रक्रिया केली. पण, ‘पेटा’च्या कार्यकर्त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. संबंधित कार्यकर्त्यांच्या दुषित विचारांमुळे शेतक-यांच्या भावनांचा न्यायालय विचार करीत नाही. तांत्रिकदृष्ट्या न्यायालयीन अडथळा निर्माण करण्याचे कारस्थान काही शेतकरीद्वेषी लोक करीत आहेत. त्यामुळेच बैलगाडा शर्यतीला अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे शेतक-यांच्या भावनांशी खेळणा-या ‘पेटा’च्या विरोधात आता जनआंदोलनाचा ‘रेटा’ निर्माण करण्यात येणार आहे. त्यासाठीच आमदार लांडगे यांनी ‘पेटा’ हटाव…महाराष्टाची संस्कृती बचाव…चा नारा दिला आहे.
राज्यातील तमाम बैलगाडा मालक-चालक आणि शौकिन, तसेच सर्वपक्षीय नेत्यांच्या पुढाकाराने चाकण येथे शनिवारी बैलगाडा शर्यत पुन्हा सुरु करण्याबाबत राज्यव्यापी आंदोलन सुरु झाले. या आंदोलनात पुणे जिल्ह्यातील अखिल भारतीय बैलगाडा मालक-चालक कृती समितीचे पदाधिकारी, शेतकरी, गाडामालक यांनी सहभाग घेतला. आमदार लांडगे यांनी केलेला पेहराव यानिमित्ताने लक्षवेधी होता.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button