breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

बेंगळुरुत १० हजार बोगस मतदान ओळखपत्र जप्त

बेंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या अखेरच्या दिवसांत बेंगळुरूत एका अपार्टमेंटमध्ये सुमारे १० हजार मतदान ओळखपत्र आढळून आल्याने राजकीय वातावरण तापले आहे. याप्रकरणी मंगळवारी रात्री उशिरा निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन याची माहिती दिली.

दरम्यान, याप्रकरणी भाजपाने एका काँग्रेस नेत्यावर आरोप केले आहेत. हे अपार्टमेंट एका काँग्रेस नेत्याचे असल्याचे भाजपाने म्हटले आहे. राजा राजेश्वरी नगर मतदारसंघातील निवडणूक रद्द करण्याची मागणी भाजपाने निवडणूक आयोगाकडे केली आहे. काँग्रेसने भाजपाच्या आरोपाला प्रत्युत्तर दिले असून भाजपाचे हे नाटक असल्याचे म्हटले आहे. भाजपाने बनावट पुरावे गोळा केल्याचे आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे.

कर्नाटकचे मुख्य निवडणूक आयुक्त संजीव कुमार यांनी याप्रकरणी पत्रकार परिषद आयोजित केली होती. ते म्हणाले की, ९७४६ मतदान ओळखपत्र खरे वाटतात, ते एका छोट्या पॅकेटमध्ये ठेवण्यात आले आहेत. त्यावर पत्ता आणि नावांची नोंद आहे. याप्रकरणी योग्यवेळी योग्य ती कारवाई केली जाईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button