breaking-newsआंतरराष्टीयपुणेमहाराष्ट्र

“बीएमसीसी’ची पर्यावरणपूरक महाविद्यालयाच्या दिशेने वाटचाल

 

बायोगॅस प्रकल्पाचे उद्‌घाटन : संपूर्ण परिसर पर्यावरणपूरक करण्याचा संकल्प
– रेनवॉटर हार्वेस्टिंग, ग्रे वॉटर रिचार्ज, ई-कचरा संकलन प्रकल्प होणार कार्यन्वित

पुणे – बायोगॅस, रेनवॉटर हार्वेस्टिंग, ग्रे वॉटर रिचार्ज, ई-कचरा संकलन अशा विविध प्रकल्पांच्या माध्यमातून बीएमसीसी महाविद्यालयाला देशातील पहिले पर्यावरणपूरक महाविद्यालय बनण्याकडे वाटचाल करणार आहे. येत्या वर्षभरात हे सर्व प्रकल्प पूर्णपणे कार्यन्वित करून त्याद्वारे महाविद्यालयाला पर्यावरणीय घटकांबाबतही स्वायत्त करण्याचा मानस आहे, अशी माहिती डेक्कन एज्यूकेशन सोसायटी नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांनी दिली. बीएमसीसी महाविद्यालयाबरोबरच सोसायटीच्या इतरही महाविद्यालय आणि शाळांमध्ये असा उपक्रम राबविणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
बीएमसीसी महाविद्यालयातर्फे यंदा 75 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने महाविद्यालयाचा संपूर्ण परिसर हा पर्यावरणपूरक करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. याचाच एक भाग म्हणून महाविद्यालयाच्या आवारात उभारण्यात आलेल्या बायोगॅस प्रकल्पाचे सोमवारी उद्‌घाटन करण्यात आले. पुणे उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. विजय नारखेडे आणि डॉ. कुंटे यांच्या हस्ते हे उद्‌घाटन झाले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत रावळ, डेक्कन एज्यूकेशन सोसायटी नियामक मंडळाचे सदस्य किरण शाळीग्राम, ज्येष्ठ उद्योजक नितीन देशपांडे, के.पी.आय.टी. ग्रुपचे चेअरमन रवी पंडित हे उपस्थित होते.

डॉ. कुंटे म्हणाले, “पर्यावरण हा विषय केवळ जागतिक पर्यावरण दिना पुरता मर्यादित न राहता तो रोजच्या जगण्यातील अविभाज्य भाग बनावा असा या उपक्रमामागील उद्देश आहे. हे प्रकल्प कार्यान्वित झाल्यावर महाविद्यालय ऊर्जेच्या बाबतीत स्वायत्त होईल. तसेच पर्यावरणपूरक प्रकल्पांच्या माध्यमातून महाविद्यालयाचे प्रतिवर्षी 51 लाख एवढी रक्कम वाचेल. विविध संस्थांच्या सहकार्याने पर्यावरणपूरक प्रकल्प कार्यान्वित करण्यात येणार आहे.’

असे असतील प्रकल्प :
– रेन वॉटर हार्विस्टिंगदवारे पावसाचे पाणी साठवणार.
– बोअरवेल्स रिचार्ज करून भुगर्भातील पाणी पातळी वाढविण्यावर भर.
– शीड्रर आणि ब्रिकेटींग मशीन बसवून पालापाचोळ्याच्या सहाय्याने कांडी कोळसा बनविणार.
– आंघोळीचे पाणी प्रक्रिया करून ते फ्लशींगसाठी वापरण्यात येणार आहे.
– ई-कचरा संकलन केंद्र सुरू करण्यात येणार आहे.
– सॅनिटरी नॅपकीन्स आणि प्लॅस्टीक बॉटल्सची विल्हेवाट शास्त्रशुद्ध पद्धतीने करण्यासाठी मशीन्स येथे बसविणार.

  • असा आहे बायोगॅस प्रकल्प :
    बी.एम.सी.सी. महाविद्यालयात प्रतिदिन 22.5 किलो अन्न कचरा जिरवण्याची क्षमता असलेले यंत्र बसवले आहे. या यंत्राचे नाव “वायु’ आहे. यामुळे हॉस्टेलचा अन्न कचरा बाहेर जाणार नाही, तर त्यातून वर्षाचे 19 किलोचे 22 सिलिंडर इतके इंधन निर्माण होईल. यंत्रामध्ये 3000 लिटर क्षमतेचा डायजेस्टर व 3000 लिटर गॅस साठवणूक करणारा फुगा वापरला आहे. हे यंत्र वापरताना वीजेचा वापर करावा लागत नाही, कचराही जसाच्या तसा टाकला तरी चालतो. तसेच त्यातून अत्यंत ताकदीचे जैविक खत निर्माण होणार आहे, ज्याचा वापर कॉलेजमधील बागेसाठी होणार आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button