breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

बीएमसीच्या ठेकेदारांवर आयकर विभागाचे छापे, 735 कोटींचा गैरव्यवहार उघड

मुंबई | महाईन्यूज

राज्यात राष्ट्रपती राजवट लागल्यानंतर सत्ता स्थापनेसाठी महाशिवआघाडीकडून प्रयत्न होत असताना मुंबईत आयकर विभागाने मोठी कारवाई केली आहे. आयकर विभागाने मुंबई महानगरपालिकेच्या कंत्राटदारांच्या 37 खाजगी ठेकेदारांवर  छापे टाकले आहे. इंटेलिजन्सकडून मिळालेल्या माहितीननंतर आयकर विभागाने ही कारवाई केली आहे. 735 कोटी रूपयांचा आर्थिक गैरव्यवहार उघड  झाला असून हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे आयकर विभागाने सांगितले आहे.

महापालिकेच्या कंत्राटदार कंपन्यांनी मोठय़ा प्रमाणात कर चुकवलाच, पण आर्थिक गैरव्यवहारही केल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे. आर्थिक गैरव्यवहार 735 कोटी इतका असून हा आकडा आणखी वाढू शकेल, असा दावा आयकर विभागाने केला.

6 नोव्हेंबरला आयकर विभागाने मुंबई आणि सुरत येथील 37  ठिकाणी छापे घालून चौकशीला सुरुवात केली. ही ठिकाणे मुंबई महापालिकेचे कंत्राटदार आणि त्यांना  गैरव्यवहारात सहकार्य करणाऱ्या अन्य कंपन्या, वित्तीय संस्थांशी संबंधित आहेत. सात ठिकाणांवर चौकश  सुरू होती.  या कारवाईतून कंत्राटदार आणि त्यांच्या कंपन्यांनी मोठय़ा प्रमाणावर कर बुडवल्याचे तसेच आर्थिक गैरव्यवहार केल्याचे पुरावे हाती लागल्याची माहिती प्राप्तिकर विभागाच्या आयुक्त आणि प्रवक्त्या सुरभी अहलुवालिया यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button