breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

बिहारमध्ये लवकरच राजकीय स्फोट! जदयूचे १७ आमदार राजदमध्ये दाखल होणार

पाटणा – बिहारमध्येही लवकरच राजकीय स्फोट होण्याची शक्यता आहे. कारण नितीश कुमार यांच्या नेतृत्त्वातील जदयूचे १७ आमदार राष्ट्रीय जनता दलात दाखल होणार असल्याचे म्हटले जात आहे. हे आमदार भाजपवर नाराज असल्याने ते पक्षांतर करणार असल्याचं राजदच्या नेत्याने म्हटलं आहे.

वाचा :-आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सेवा ३१ जानेवारीपर्यंत बदंच, केंद्र सरकारकचा निर्णय

राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि माजी मंत्री श्याम रजक यांनी हा दावा केला आहे. संयुक्त जनता दलाचे १७ आमदार आपल्या संपर्कात आहेत आणि लवकरच राजदमध्ये प्रवेश करण्यास इच्छुक असल्याचा दावा रजक यांनी केला आहे. “जदयूचे आमदार भाजपाच्या कार्यशैलीमुळे नाराज आहे. त्यामुळे बिहारमधील नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीएचं सरकार पाय उतार करण्याच्या तयारीत आहेत. भाजपामुळे नाराज असल्यानेच हे १७ आमदार राजदमध्ये येण्यास इच्छुक आहेत. पण त्यांना तुर्तास त्यांना थांबण्यात आलं आहे,” असं रजक यांनी म्हटलं आहे.

“जदयूचे हे १७ आमदार राजदमध्ये येण्यास तयार आहेत. त्यांना आताच पक्षात घेतले, तर पक्षांतर बंदी कायद्यानुसार त्यांचं सदस्यत्व रद्द होऊन आमदारकी धोक्यात येऊ शकते. पक्षांतर कायद्याप्रमाणे २५ ते २६ आमदार एकाच वेळी जदयूतून बाहेर पडून राजदमध्ये आले, तर त्यांचं सदस्यत्व कायम राहिल,” असंही रजक म्हणाले. काही दिवसांपूर्वी भाजपाने एनडीएतील घटक पक्ष असलेल्या आणि बिहारमध्ये सत्तेत असलेल्या जदयूचे सहा आमदार फोडले. त्यामुळे जदयूमधून नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे. नितीश कुमार यांनीही ही नाराजी व्यक्त केली आहे. या घटनेमुळेच १७ आमदार नाराज असल्याचा दावा रजक यांनी केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button