breaking-newsक्रिडा

बिश्तच्या झंझावातामुळे मुंबईचा सलग तिसरा विजय

  • मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धा
  • मध्य प्रदेशचा नऊ गडी राखून धुव्वा उडवण्यात यश; तरेचेही दमदार अर्धशतक

युवा सलामीवीर जय बिश्तने (६८ धावा) साकारलेल्या तुफानी अर्धशतकाला अनुभवी आदित्य तरेच्या (नाबाद ७४) फटकेबाजीची अप्रतिम साथ लाभल्यामुळे मुंबईने सोमवारी सय्यद मुश्ताक अली करंडक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेतील ‘ड’ गटातील लढतीत मध्य प्रदेशचा नऊ गडी आणि २५ चेंडू राखून धुव्वा उडवला. मुंबईचा हा सलग तिसरा विजय ठरला.

वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या पार्थ साहनी (४७) आणि आनंद बैस (नाबाद ३१) यांच्या उपयुक्त फलंदाजीमुळे मध्य प्रदेशने २० षटकांत ५ बाद १५९ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. मुंबईतर्फे तुषार देशपांडे, शाम्स मुलानी यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.

प्रत्युत्तरात बिश्त आणि तरे यांनी नेहमीप्रमाणे आक्रमक सुरुवात करताना ११.४ षटकांत १११ धावांची सलामी दिली. बिश्तने अवघ्या २७ चेंडूंत अर्धशतक झळकावताना सात चौकार आणि चार षटकारांसह ६८ धावा फटकावल्या. बिश्त बाद झाल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवच्या (नाबाद २०) साथीने तरेने दुसऱ्या गडय़ासाठी ५४ धावांची अभेद्य भागीदारी रचली. १० चौकार व २ षटकारांसह तरेने ४८ चेंडूंत नाबाद ७४ धावा केल्या. सूर्यकुमारने चौकार लगावून मुंबईचा विजय साकारला.

२ जय बिश्तने स्पर्धेतील दुसरे अर्धशतक साकारले. मिझोरामविरुद्ध त्याने २४ चेंडूंत ५४ धावा फटकावल्या होत्या.

संक्षिप्त धावफलक

मध्य प्रदेश : २० षटकांत ५ बाद १५९ (पार्थ साहनी ४७, आनंद बैस नाबाद ३१; शाम्स मुलानी १/१७) पराभूत वि. मुंबई : १५.५ षटकांत १ बाद १६५ (आदित्य तरे नाबाद ७४, जय बिश्त ६८; कुलदीप सेन १/२९).

आजचा सामना

* मुंबई वि. पुद्दुचेरी

* वेळ : दुपारी २ वा.

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २

महाराष्ट्राची उत्तर प्रदेशवर मात

+कुशल सलामीवीर ऋतुराज गायकवाडने (८१ धावा) साकारलेल्या धडाकेबाज अर्धशतकाच्या बळावर महाराष्ट्राने सोमवारी ‘क’ गटातील सामन्यात उत्तर प्रदेशला आठ गडी आणि ३४ चेंडू राखून धूळ चारली. उत्तर प्रदेशने दिलेले १४९ धावांचे आव्हान महाराष्ट्राने १४.२ षटकांत गाठून दुसरा विजयाची नोंद केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button