breaking-newsपुणे

बारावीचा निकाल आज जाहीर होणार…

  • दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर होणार निकाल 

पुणे – राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल आज (30 मे) दुपारी एक वाजता ऑनलाईन पध्दतीने जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती राज्य बोर्डाचे सचिव अशोक भोसले यांनी दिली.

निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळे
www.mahresult.nic.in
www.result.mkcl.org
www.maharashtraeducation.com
http://www.knowyourresult.com
www.rediff.com/exams
hscresult.mkcl.org
http://jagranjosh.com/results
www.bhaskar.com

गेल्या काही दिवसांपासून समाज माध्यमांमध्ये बारावीच्या निकालाबाबत तारखा फिरत होत्या. मात्र याला आता पूर्णविराम मिळाला असून राज्य मंडळाने अधिकृतरित्या जाहीर केल्याप्रमाणे बारावीचा निकाल बुधवारी दुपारी एक वाजता मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे. राज्यात 15 लाख विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती.
या विद्यार्थ्यांना निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून ज्या विद्यार्थ्यांना गुणपडताळणी व छायाप्रतीसाठी अर्ज करायचा आहे त्यांना तो करता येणार आहे. त्यासाठी अर्जाचा आवश्‍यक नमुना संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी तो डाऊनलोड करुन स्वयंसाक्षांकित गुणपत्रिकेच्या प्रतिसह विद्यार्थ्यांनी 31 मे ते 9 जून या कालावधीत तो अर्ज व शुल्क भरुन विभागीय मंडळाकडे सादर करायचा आहे. उत्तरपत्रिकेचे पुनर्मुल्यांकन करण्यासाठी आधी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे आवश्‍यक आहे.

बारावीची पुरवणी परीक्षा जुलै ते ऑगस्टदरम्यान
इयत्ता बारावीची ऑक्‍टोबर महिन्याऐवजी जुलै महिन्यात घेण्यात येणारी पुरवणी परीक्षा जुलै ते ऑगस्ट महिन्यात घेण्यात येणार असल्याची माहिती राज्य बोर्डाचे सचिव अशोक भोसले यांनी दिली. जे विद्यार्थी बारावीच्या परीक्षेत अनुतीर्ण होतील त्यांना या माध्यमातून पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळणार असून यासाठीचे ऑनलाईन अर्ज लवकरच भरण्यात येणार असल्याचेही भोसले यांनी सांगितले.

छायाप्रतीसाठी 31 मे ते 19 जूनपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येईल. ज्या विद्यार्थ्यांना श्रेणी सुधार करुन घ्यायचे असेल अशा विद्यार्थ्यांना जून ते ऑगस्ट व फेब्रुवारी ते मार्च 2019 अशा दोनच संधी उपलब्ध असतील असेही बोर्डाकडून सांगण्यात आले आहे.

बीएसएनएलवर निकाल मिळविण्यासाठी MHHSC जागा सोडून बैठक क्रमांक लिहून 57766 या क्रमांकावर पाठवायचा आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button