breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बारामतीत गोपीचंद पडळकरांविरोधात गुन्हा दाखल

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करणं गोपीचंद पडळकर यांना भोवलं आहे . एकिकडे राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक होत निषेध आंदोलन करत आहेत. दुसरीकडे आता बारामतीत गोपीचंद पडळकरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पडळकरांच्या या वक्तव्यावर त्यांच्याविरोधात दाखल झालेला हा राज्यातील पहिला गुन्हा आहे. राज्यात इतर ठिकाणी देखील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून गुन्हा दाखल करण्याची मागणी होती आहे. त्यामुळे पडळकर चांगलेच अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्यावतीने शहर पोलीस स्टेशनला भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत तक्रार अर्ज दिला होता. तसेच जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत पोलीस स्टेशनवर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला. यानंतर पोलिसांनी संबंधित तक्रारीवरुन आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल केला. त्यांच्यावर 505(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

संबंधित तक्रारीत म्हटलं आहे, “राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना 2017 मध्ये भारत सरकारचा क्रमांक 2 चा नागरी पुरस्कार पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. तसेच ते भारताचे माजी कृषीमंत्री आणि माजी संरक्षण मंत्री आहेत. असं असतानाही भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्याविरोधात द्वेष निर्माण होईल अशा हेतूने विधान केलं. यात त्यांनी शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे, असं विधान केलं. कोरोना हा जगभरात संसर्ग होत असलेला साथीचा महारोग आहे. असं असताना पडळकरांनी शरद पवार यांची तुलना कोरोनाशी केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या आणि संपूर्ण बारामतीकरांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांचे हे वक्तव्य द्वेष पसरवणारे आहे. यामुळे सामाजिक तेढ निर्माण होण्याचा धोका आहे.”

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button