breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

बारामतीत अजित पवार विरुध्द गोपीचंद पडळकर सामना रंगणार

पुणे, महाईन्यूज

गोपीचंद पडळकर हे ढाण्या वाघ आहेत, त्यांनी बारामतीतून लढावं असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. गोपीचंद पडळकर हे वंचित आघाडीमध्ये गेले होते. मात्र, आज त्यांनी पुन्हा एकदा भाजपात प्रवेश केला.

मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे गोपीचंद पडळकर यांची बारामतीमधली उमेदवारी निश्चित मानली जात आहे. यावेळी पडळकर यांनी बारामतीतून निवडणूक लढवावी का? असं विचारताच सगळ्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना हो असं म्हटलं. त्यामुळे आता पडळकर विरुद्ध अजित पवार असा सामना बारामतीत बघायला मिळण्याची शक्यता आहे. पडळकर बारामतीमधून लढणार हे निश्चित झालं आहे, त्यावर अधिकृत शिक्कामोर्तब होणं बाकी आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गोपीचंद पडळकर यांच्यासह भाजपात मेगा भरती होणार असल्याची चर्चा होती. प्रत्यक्षात तीन जणांनी भाजपात प्रवेश केला. मुंबईतील गरवारे क्लबमध्ये सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी वंचित आघाडीतून बाहेर पडलेले आणि पूर्वाश्रमीचे भाजपाचे कार्यकर्ते गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा भाजपात घरवापसी केली.

पत्रकार परिषदेनंतर माध्यमांशी बोलताना शरद पवार देतील ती जबाबदारी घेऊ असे अजित पवार यांनी स्पष्ट केलं होतं. बारामतीतून लढ असं पवार साहेबांनी आपल्याला सांगितल्याचंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं होतं. त्यामुळे बारामती विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकिटावर अजित पवार लढणार हे जवळपास निश्चित मानले जाते. अशात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गोपीचंद पडळकर यांनी बारामतीतून लढावं असं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे अजित पवारांच्या विरोधात गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी देण्यात आली तर ही लढत निश्चितच रंगतदार होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button