breaking-newsपुणे

बारामतीतील दत्त मंदिर रातोरात गायब!

बारामती – महाराष्ट्रातील सर्वात शक्तिशाली राजकीय नेते बारामतीत राहतात. त्यामुळे बारामतीत काहीही घडू शकते. यापूर्वी बारामतीतील शेतकऱ्याचा पुतळा आणि नगरपरिषदेची कमान रातोरात हटविण्याचे प्रकार घडले होते. आता निरा डाव्या कालव्यालगत निसर्गरम्य वातावरणात असलेले दत्तमंदिर गायब झाले आहे. त्यामुळे आज सकाळी दत्त दर्शनासाठी आलेल्या भाविकांना फार मोठा धक्का बसला. या ठिकाणी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.

हे मंदिर कोणी हटविले याबाबत अद्याप तरी माहिती पुढे आलेली नाही. यापूर्वी बारामतीत तीन हत्ती चौकानजीकचा शेतकऱ्याचा पुतळा असाच गायब झाला होता. त्यानंतर लॉकडाऊनमध्ये बारामती नगरपालिकेची कमान रातोरात जमीनदोस्त करण्यात आली होती. ती कमान नव्याने बांधण्याचे काम पालिकेने सुरू केले आहे. परंतु तीन हत्ती चौकातून जाणाऱ्या माळावरच्या देवी मंदिर रस्त्यावरील हे दत्त मंदिर गायब होण्यामागील कारण काय? हे नागरिकांना आणि दत्तभक्तांना कळेनासे झाले आहे. हे दत्त मंदिर निरा डाव्या कालव्यालगत निसर्गरम्य वातावरणात असल्यामुळे अनेक भाविक या मंदिरात शांततेच्या शोधात यायचे. आता हे दत्त मंदिरच रातोरात गायब झाले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button