breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

बाबरी मशिदीसाठी सुन्नी वक्फ बोर्डाला जमिनीचा प्रस्ताव… पाच जागांचे पर्याय…

अयोध्येतील पंचक्रोशी परिक्रमेच्या परिघाबाहेर उत्तर प्रदेश सरकारनं सुन्नी वक्फ बोर्डाला मशिदीसाठी जमिनीचा प्रस्ताव दिला आहे. पंचक्रोशी परिक्रमेबाहेरील पाच जागा मशिदीसाठी सुचवण्यात आल्या आहेत. तसंच केंद्रीय गृह मंत्रालयाच्या परवानगीसाठी या जागांची यादीदेखील पाठवण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयानं ९ नोव्हेंबर रोजी मशिदीच्या उभारणीसाठी पाच एकर जागा देण्याचे आदेश दिले होते.

अयोध्येजवळ असलेल्या महामार्गाजवळील पाच जागा मशिदीसाठी सुचवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. टाइम्स ऑफ इंडियानं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. दरम्यान, सुचवण्यात आलेल्या जमिनीची यादी केंद्रीय गृहमंत्रालयाकडे पाठवण्यात आली आहे. अयोध्या-फैजाबाद महामार्ग, अयोध्या-बस्ती रोड, अयोध्या-सुल्तानपुर रोड, अयोध्या-गोरखपूर रोड, आणि आणखी एक जागा सुचवण्यात आली आहे. या जागा पंचक्रोशी परिक्रेमेच्या परिघाबाहेर निश्चित करण्यात आल्या आहेत. हिंदू आणि मुस्लीम समाजाचे उत्सव एकाच वेळी आल्यास कोणतीही अडचण येऊ नये यासाठी या जागा सुचवण्यात आल्याचंही सांगण्यात आलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button