breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

बापरे 😱! सिद्धिविनायकाला ३५ किलो सोनं दान; सोन्याची किंमत १४ कोटी रुपये…

मुंबई | महाईन्यूज |

दिल्लीमधील एका गणेशभक्ताने मुंबईमधील प्रभादेवी येथील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरामध्ये ३५ किलो सोने दान म्हणून दिले आहे. या सोन्याची किंमत १४ कोटी रुपये इतकी आहे. मंदिराच्या २१९ वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या भक्ताने एवढ्या रकमेची वस्तू दान म्हणून दिली आहे. १५ जानेवारी ते १९ जानेवारी दरम्यान शेंदूर लेपणासाठी मंदिर बंद ठेवण्यात आलं होतं.

सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी दान म्हणून मिळालेल्या या सोन्याचा वापर मंदिराला सुवर्ण झळाळी देण्यासाठी करण्यात आल्याची माहिती दिली आहे. या सोन्यातूनच मंदिराचा गाभारा, दरवाजा आणि घुमटाला सोन्याचा मुलामा चढवण्यात आल्याचे बांदेकर यांनी सांगितलं. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात सोने दान करणाऱ्या दात्याच्या नावाबद्दल बांदेकरांनी कोणताच खुलासा केलेला नाही.

बांदेकरांनी दिलेल्या माहितीनुसार २०१७ साली मंदिराला एकूण ३२० कोटी रुपयांचे दान मिळाले आहे. २०१९ मध्ये या रक्कमेमध्ये ९० कोटींनी वाढ होऊन दान म्हणून मिळालेली एकूण रक्कम ४१० कोटी इतकी झाली. दान म्हणून मिळालेल्या या रक्कमेमधून गरजूंना मदत करण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. १९ नोव्हेंबर १८०१ मध्ये या मंदिराची स्थापना झाली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button