breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बापरे! औरंगाबादमध्ये अघोरी प्रकार; 25 वर्षीय व्यक्तीने स्वत:चा गळा चिरत शिवलिंगावर केला रक्ताचा अभिषेक

औरंगाबाद |

औरंगाबाद येथून एक अघोरी प्रकार समोर आला आहे. एका 25 वर्षीय व्यक्तीने स्वत:चा गळा चिरुन शिवलिंगावर रक्ताचा अभिषेक केला आहे. औरंगाबाद येथील पैठण मधील महादेव मंदिरात या व्यक्तीचा मृतदेह सापडलेला असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडालेली आहे. अंधश्रद्धेला बळी पडून या व्यक्तीने असे पाऊल उचलल्याचे पोलिसांनी म्हटलेले आहे. नंदू घुंगसे असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. ते कहारवाड गावातील रहिवासी असून मच्छिमारीचा व्यवसाय करत होते. या घटनेसाठी 4 प्रत्यक्षदर्शींची साक्ष मिळालेली आहे.

आवश्य वाचा- धक्कादायक! ‘हे भारत माते मला माफ कर’, छेडछाडीला कंटाळून 17 वर्षीय मुलीची आत्महत्या

पैठण शहरातील गागाभट्ट चौकामधील सिद्धी अली दर्ग्याजवळ हे मंदिर आहे. बिहारी परदेशी नामक व्यक्ती मंदिरामध्ये पाया पडायला गेली असता त्यांना घुंगसे यांचा मृतदेह आढळून आला आहे. परदेशी यांनी त्वरीत पोलिसांना या घटनेची माहिती दिलेली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घुंगसे यांना हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आलेले आहे. प्रत्यक्षदर्शींपैकी एका व्यक्तीने सांगितले की, “घुंगसे यांना स्वत:चा गळा चिरुन शिवलिंगावर रक्ताचा अभिषेक केला.” आपल्यावर खूनाचा आरोप येईल या भीतीपोटी प्रत्यक्षदर्शींनी त्याला अडवण्याचा प्रयत्न नाही केला.

सुरुवातीला कुठल्याही प्रत्यक्षदर्शीने घडलेल्या प्रकाराबद्दल माहिती देण्यास नकार दिला होता. परंतु, एका प्रत्यक्षदर्शीने पुढे येऊन पोलिसांना या प्रकाराबद्दल माहिती दिली. त्यानंतर सर्व प्रत्यक्षदर्शींशी बोलल्यानंतर घुंगसे यांनी अहोरी प्रकारातून स्वत:;ची हत्या केल्याच्या निष्कर्षावर पोलिस पोहचले आहेत. अंधश्रद्धेच्या आहारी गेल्याने अनेक लोकांकडून अघोरी प्रकार घडतात. त्यातून बळी देणे यांसारख्या घटना समोर येतात. अंधश्रद्धेचा पगडा इतका भयंकर असतो की, स्वत:चा किंवा स्वत:च्या बाळाचा, जवळच्या व्यक्तींचा बळी देण्यासही मागे पुढे पाहिले जात नाही.

आवश्य वाचा- धक्कादायक! ‘हे भारत माते मला माफ कर’, छेडछाडीला कंटाळून 17 वर्षीय मुलीची आत्महत्या

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button