breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

बाजारात कर्नाटक हापूसची चलती; आवक मोठ्या प्रमाणात वाढली।

पुणे– अक्षय तृतीया अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपली असतानाच बाजारात रत्नागिरी हापूस आंब्याची आवक घटली आहे. तर दुसरीकडे कर्नाटक हापूसची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. रत्नागिरी हापूसचा तुटवडा असतना कर्नाटक हापूस मुबलक प्रमाणात बाजारात उपलब्ध आहे. विशेष म्हणजे  रत्नागिरी हापूसपेक्षा कमी दराने कर्नाटक आंबा मिळतो. त्यामुळे बाजारात कर्नाटक हापूसचीच चलती आहे.
अक्षय तृतीयेलाही नागरिकांना बाजारात कर्नाटक आंब्याचा पर्याय उपलब्ध असणार आहे. घाऊक बाजारात रत्नागिरी हापूस आंब्यास प्रती डझनास 300 ते 600 रुपये, तर कर्नाटक आंब्यास प्रतिडझन 200 ते 400 रूपये मोजावे लागत आहेत. गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील फळबाजारात मागील आठवड्यात कर्नाटक हापूसची दररोज 14 ते 15 हजार पेट्या आवक होत होती. मात्र, त्यामध्ये वाढ होऊन रविवारी 20 ते 25 हजार पेट्या इतकी आवक झाली. तर रत्नागिरी हापूसची गेल्या आठवड्यात सुमारे 10 ते 12 हजार पेट्या आवक होत होती. त्यामध्ये घट होऊन रविवारी अवघ्या 7 हजार पेट्या आंब्याची आवक झाली आहे. त्यामुळे रत्नागिरी हापूसच्या दरात गेल्या आठवड्याच्या तुलनेत पेटीमागे 100 ते 20 रुपयांनी वाढ झाली आहे. तर दुसरीकडे कर्नाटक हापूस स्वस्त आहे आहेत. रत्नागिरी हापूसला साजेसे असल्यामुळे कर्नाटक हापूसला ग्राहकांकडून मोठी मागणी वाढली आहे.
याबाबत कर्नाटक हापूसचे व्यापारी रोहन उरसळ म्हणाले, बाजारात चांगल्या प्रतीच्या कर्नाटक हापूसची आवक वाढली आहे. कच्च्या आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. तरीही मोठ्या प्रमाणात तयार माल बाजारात उपलब्ध आहे. अक्षयतृतीयेला परवडणाऱ्या दरात हा आंबा बाजारात उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना आंबा खरेदी करता येणार आहे. याबाबत रत्नागिरी हापूसचे व्यापारी करन जाधव म्हणाले, बाजारात चांगल्या प्रतीचा आंबा दाखल होत आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत रत्नागिरी आंब्याची आवक घटली आहे. त्यामुळे गेल्या आठवड्याच्या तुलनेत आंब्याच्या दरात वाढ झाली आहे. अक्षय तृतीयेनंतर पुन्हा आंब्याच्या आवक वाढेल.
घाऊक बाजारातील हापूसच्या पेटीचे दर
रत्नागिरी हापूस (कच्चा)दर
4 ते 7 डझन, 1200 ते 1800
5 ते 10 डझन, 1500 ते 2500
रत्नागिरी हापूस (तयार ) दर
4 ते 7 डझन, 1500 ते 2000
5 ते 10 डझन, 2000 ते 3000

कर्नाटक आंबा डझन दर
कच्चा हापूस 3 ते 5 डझन, 500 ते 1000
तयार हापूस 3 ते 5 डझन, 800 ते 1500
कच्चा पायरी 1 डझन 1 00-200
तयार पायरी 1 डझन 150-300

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button