breaking-newsताज्या घडामोडीपुणे

बांधकाम विभागाचे अभियंता राजन पाटलांसह सगळे अधिकारी निलंबित करा

आयुक्तांकडे शिवसेना गटनेते राहूल कलाटे यांची मागणी 

पिंपरी- शहरात बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांच्या  आर्शिवादाने अनधिकृत बांधकामे फोफावली आहेत.  शहरात अनधिकृत बांधकाम सुरू असेल, तर बीट निरीक्षक बांधकामाच्या मालकाला महापालिकेत बोलवून पैसे घेत आहेत. त्यामुळे अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे टाळत आहेत. याबाबत व्हिडीआे चित्रण माझ्याकडे उपलब्ध आहे. त्यामुळे बांधकाम विभागातील सहशहर अभियंता राजन पाटलांसह सर्वच अधिकाऱ्यांना निलंबित करा, अशी मागणी शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी महासभेत केली.

शुक्रवारी झालेल्या महासभेच्या अध्यक्षस्थानी महापौर नितीन काळजे होते. यावेळी गटनेते राहुल कलाटे म्हणाले की, ”  शहरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई न करता, बांधकाम विभागाचे  बीट निरीक्षक तिथे जाऊन पैशाची मागणी करतात. बांधकाम करणा-या नागरिकांना महापालिकेत बोलावून घेतात. त्या मालकाकडून पैसे घेऊन त्यांच्यावरील कारवाई टाळली जाते. महापालिकेच्या बांधकाम विभागात सर्रासपणे हा कारभार सुरु आहे. त्यामुळे  बांधकाम विभागातील सर्वच अधिकाऱ्यांना निलंबित करा, त्यांची चाैकशी करा. तसेच नगररचना विभागातही नगरसेवक तिथे गेले की, फाईली लपविल्या जातात. प्रभागातील आरक्षणे परस्पर बदलली जात आहेत. याबाबत नगरसेवकांना थांगपत्ता नसतो, त्यामुळे नागरिकांच्या समोर नगरसेवक बदनाम होवू लागले आहेत. याविषयी सखोल चाैकशी करुन कारवाई करावी, अशी मागणी कलाटे यांनी आयुक्तांकडे केली.

यावर सभागृह नेता एकनाथ पवार म्हणाले, “अधिकारी पैसे घेत असतील तर नक्कीच त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. भाजप पारदर्शक कारभार करत आहे. अशा प्रकाराला नक्कीच पाठिशी घालणार नाही”  नगरसेविका मंगला कदम म्हणाल्या की, इतिहासात पहिल्यांदाच पुराव्यासह कलाटे यांनी घटना समोर आणली आहे. आयुक्तांचा या प्रकारावर वॉच असला पाहिजे. तसेच बांधकाम विभागाच नव्हे तर अतिक्रमण विभागात देखील अशाच प्रकारे उद्योग सुरु असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, महापौर नितीन काळजे यांनी या प्रकरणी सखोल चौकशीचे आदेश आयुक्तांना दिले. संबंधितावर कडक कारवाईची सुचनाही त्यांनी यावेळी केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button