breaking-newsपुणे

बांधकाम विकास विभागातर्फे अनधिकृत बांधकामावर कारवाई

पुणे – महापालिकेच्या बांधकाम विकास विभागाच्या एक, दोन आणि सहाच्या वतीने अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली. या कारवाईत 19 हजार 924 चौ. फुट क्षेत्र मोकळे करण्यात आले.

झोन एकमधील धानोरी येथील रवीसिंग राजपुरोहित यांचे 4456 चौ. फुट, छोगालाल चौधरी यांचे 602 चौ. फुट, मनोज अगरवाल यांचे 129 चौ. फुट, माधुरी तिलवेरा यांचे 215 चौ. फुट, मुकुंद गाडवे यांचे 58 चौ. फुट आणि गोकुळनगर येथील काशीनाथ इंगले यांचे 570 चौ. फुट असे एकूण 6032 चौ. फुट क्षेत्र मोकळे करण्यात आले.

तसेच खराडी येथील सिडम इंटरनॅशनल स्कूल यांचे 20144 चौ. फुट, सुभाष गुप्ता यांचे 2475 चौ. फुट, पूनम काची यांचे 43 चौ. फुट असे एकूण 4562 चौ. फुट क्षेत्र मोकळे करण्यात आले.
कोंढवा ब्रुद्रुक येथील करोना को. ऑप. सोसायटी यांचे 6 हजार चौ. फुट, सर्व्हे नं. 8 येथील अभिलाषा गायकवाड यांचे 100 चौ. फुट, शमीम अन्सारी यांचे 100 चौ. फुट असे एकूण 6200 चौ. फुट क्षेत्र मोकळे करण्यात आले.

ही कारवाई एक पोलीस कर्मचारी गट, 10 बिगारी, एक गॅसकटर, एक जेसीबी यांच्या सहाय्याने करण्यात आली. झोन सहामधील शिवाजीनगर भागातील जंगली महाराज रस्त्यावरील हॉटेल फुल पराठा यांचे 750 चौ. फुट, पराठा हाऊस यांचे 100 चौ. फुट, हॉटेल निरंजन यांचे 680 चौ. फुट, क्विक हिल यांचे 1600 चौ. फुट असे एकूण 3130 चौ. फुट क्षेत्र मोकळे करण्यात आले. ही कारवाई एक पोलीस गट, एक जेसीबी, एक गॅसकटर, बिगारी यांच्या सहाय्याने करण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button