breaking-newsआंतरराष्टीय

बांगला देशाच्या भारतावरील भरवशाने पाकिस्तानला मोठा झटका

ढाका (बांगला देश) – भारतावर पूर्ण विश्‍वास दाखवत बांगला देशाने पाकिस्तानला मोठाच धक्का दिला आहे. पाकिस्तानकडे दुर्लक्ष करत बांगला देशाने ओआयसी (ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॉर्पोरेशन) च्या पर्यवेक्षकपदी भारताचे नाव सुचवले आहे. भारताची सतत बदनामी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानसाठी हा मोठाच धक्का आहे.

ओआयसी ही फक्त मुस्लीमबहुल देशांची संघटना आहे. ढाका येथे ओआयसीच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत संघटनेच्या नियमांमध्ये सुधारणा करण्याची मागणी बांगला देशाचे मंत्री अबुल हसन महमूद अली यांनी केली आहे. भारतासारखा देश मुस्लिम बहुल नसला, भारतात मुस्लीम प्रचंड संख्येने आहेत. त्यामुळे तरी भारताला आयसीचे सदस्य बनवण्याची त्यांनी मागणी केली आहे.

संपूर्ण जगात इंडोनेशिया आणि पाकिस्तान यांच्यानंतर सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्येबाबत भारत 3 ऱ्या क्रमांकावर आहे. बांगला देशाच्या मागणीचा पाकिस्तान विरोध करणार हे अगदी उघड आहे. मात्र पाकिस्तानचे मित्रदेश-चीन आणि बांगला देश या सूचनेला अनुमोदन देण्याची शक्‍यता आगे आहे. मुस्लीमबहुल नसले, तरी आयोसी सदस्य देशांपेक्षाही अधिक संख्येने मुस्लिम असणारे अनेक देश आहेत. त्यांनाही ओआयसी चे सदस्य बनवावे अशी मागणी बांगला देशने केली आहे.

आयओसीचे सदस्य नसलेल्या देशांशी असणारा दुरावा कमी केला पाहिजे. त्यामुळे आयओसी करत असलेल्या चांगल्या कामापासून मोठ्या संख्येने मुस्लीम वंचित राहणार नाहीत, असे अबुल हसन महमूद अली यांनी म्हटले आहे. बांगला देशाच्या या सूचनेला आयओसीच्या महासचिवांचे समर्थन मिळाले आहे. मात्र अशा प्रस्तावांवर पाकिस्तानने सदैव व्हेटोचा वापर केला आहे

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button