breaking-newsमनोरंजन

बहूभाषिक एवलिन

बॉलीवूडमध्ये येणाऱ्या कलाकारांना हिंदी चित्रपटातून भरघोस यश मिळत असले तरी या चंदेरी नगरीतील काही कलाकारांना नीटसे हिंदी बोलता येत नाही. कॅटरिना कैफसारख्या अभिनेत्रीची याबाबत बरीचशी चर्चा होत असली तरी ती एकटी नाही. याउलट काही कलाकार मात्र भाषाप्रभू असतात. “जॅक अँड जिल’ चित्रपटातून झळकलेली एवलिन शर्माही बहुभाषिक किंवा भाषाप्रभू आहे. तिला केवळ एक-दोन नव्हे तर तब्बल 8 भाषा अवगत आहेत. मॉडेल, अभिनेत्री असा प्रवास करणाऱ्या या भाषाप्रभू नायिकेचे बालपण जर्मनीमध्ये गेले. त्यामुळे जर्मन, हिंदी, इंग्रजी यांसह अन्य भाषांचे तिला चांगलेच ज्ञान आहे. पण या चंदेरीनगरीत ज्ञानापेक्षाही नशीब अधिक महत्त्वाचं असतं असं म्हटलं जातं. एवलिन हे त्याचंच एक उदाहरण आहे.

सध्या एवलिन बॉलीवूडमध्ये स्थिरस्थावर होण्यासाठी झटते आहे. मागील काळात सनी देओलच्या “भैय्याजी सुपरहिट’ या चित्रपटातून ती रसिकांच्या भेटीला आली होती. हा चित्रपट प्रदीर्घ काळ रेंगाळला होता. सध्या एवलिनकडे चित्रपटांचे फारसे प्रस्ताव नसले तरी ती निराश नाहीये. सातत्यानं कार्यरत राहण्यावर आणि प्रयत्नांवर तिचा विश्‍वास आहे.

आतापर्यंतच्या आपल्या प्रवासाविषयी एवलिन सांगते की, मॉडेलिंग करता करता माझ्या स्वतःच्या प्रयत्नांवर जे चित्रपट मिळाले ते मी केले. डेव्हिड धवन दिग्दर्शित आणि वरुण धवन अभिनीत “मै तेरा हिरो’ या चित्रपटाला चांगले यश मिळाले. आता हळूहळू या बी-टाऊनमध्ये बस्तान बसवण्याचा प्रयत्न करत आहे. माझे कोणी नातेवाईक, मित्र अथवा जवळचे संबंध असणारे बॉलीवूडमध्ये नाहीत. त्यामुळे स्वप्रयत्नांतूनच मी इथे यशस्वी होईन. मॉडेलिंगकडून अॅक्‍टिंगकडे आल्याबद्दल ती सांगते की, प्रत्येक मॉडेल अभिनयाच्या क्षेत्रात येण्यास उत्सुक असते. मीही याला अपवाद नाही. कारण मॉडेलिंगमध्ये तुमच्या दिसण्याला, फॅशन सेन्सला महत्त्व असले तरी अभिनयाला वाव नसतो. चित्रपटातून तो मिळतो. त्यामुळे अभिनयाच्या क्षेत्रात खूप काही करण्यासारखे आहे. येणाऱ्या काळात “बाहुबली’ फेम प्रभासच्या बहुप्रतिक्षित “साहो’ या चित्रपटातून एवलिन झळकणार आहे. पाहूया आगामी काळात ती कशा प्रकारे वाटचाल करते !

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button