breaking-newsराष्ट्रिय

बस दुर्घटनेतील मृतांची संख्या 27 वरून शून्यावर

पाटणा- बिहारमधील मोतिहारी येथे गुरुवारी झालेल्या बस दुर्घटनेतील मृतांची संख्या 27वरून चक्‍क शून्य अशी झाली आहे. या दुर्घटनेसंबंधी नवीन माहिती समोर आली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी श्रद्धांजली वाहिलेले “ते’ 27 मृत प्रवाशी जीवंतच असल्याचे वृत्त आहे. अपघातात प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती खोटी होती, ज्यासाठी सरकारी यंत्रणेसहित भाजपाची मंत्रीही जबाबदार ठरला आहे.

सुत्रांनी दिलेल्या मिळालेल्या माहितीनुसार, या बसमध्ये एकूण 13 प्रवासी प्रवास करत होते. बसमध्ये कोणत्याच प्रवाशाचा मृतदेह मिळालेला नाही. भाजपाचेच आपत्ती व्यवस्थापन मंत्री दिनेश चंद्र यादव यांनी 27 प्रवाशांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला होता. ही माहिती पडताळली जात असतानाच मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एका कार्यक्रमात दुर्घटनेसंबंधी शोक व्यक्त करत नुकसानभरपाई देण्याच जाहीर केले. पाठोपाठ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांनीही ट्विट करत शोक व्यक्त केला. त्यामुळे माहितीत तथ्य असल्याचा समज झाला.

शुक्रवारी बचावकार्य पूर्ण झाल्यानंतर घटनेतील सत्य परिस्थिती समोर आली. पोलिसांना बसमध्ये एकही मृतदेह मिळालेला नाही. या दुर्घटनेतील आठ लोकांना वाचवण्यात आले असून, राखेच्या सहाय्याने कोणाचा मृत्यू झाला का याची तपासणी केली जात आहे.

दरम्यान, योग्य माहिती पडताळण्याआधीच नितीश कुमार यांच्या सरकारने केलेल्या घाईमुळे त्यांच्यावरच तोंडावर पडण्याची वेळ आली. ही दुर्घटना गुरुवारी रात्रीची आहे. बस मोतिहारी जिल्ह्यातील कोटवा परिसरात मुझफ्फरनगरहून दिल्लीला जात असताना पलटली. अपघातानंतर बसमध्ये आग लागली होती. सुरुवातीला बसमध्ये 30 प्रवासी प्रवास करत असल्याचे सांगण्यात आले. याच माहितीच्या आधारे 27 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला होता.

अद्यापही पाच लोक गायब 
दिनेश चंद्र यादव यांच्या म्हणण्यानुसार 13 नागरिकांनी बुकिंग केले होते. यातील आठ प्रवाशांना वाविण्यात आले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, अद्यापही अन्य पाच प्रवाशांबाबत काहीच माहिती मिळू शकली नाही. हे प्रवाशी आधीच बसमधून उतरले असण्याची शक्‍यता आहे किंवा दुघर्टनेतून आपली सुटका करून ते परस्पर निघून गेले असण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button